-
सध्या देशभरामध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.
-
यंदा 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे.
-
त्यामुळे सध्या राज्यासह देशामध्ये गणेश भक्तांची लगबग सुरू झाली आहे.
-
गणेश भक्तांसाठी दरवर्षी येणारा गणेशोत्सव म्हणजे जीव की प्राण असतो.
-
विविध गणेश मंडळांकडून गणेशोत्सवाची विशेष अशी तयारी सुरू असते.
-
मुख्यतः महाराष्ट्रामध्ये खास प्रकारच्या आकर्षक आणि भव्य गणेश मूर्ती हा प्रत्येक गणेशोत्सवातील आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.
-
अशीच काहीशी खास ही गणेश मूर्ती दिसत आहे. ही मूर्ती पर्यावरणस्नेही आहे. तसेच गणेशाच्या सोंडेवर विठ्ठल नामाचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.
-
भायखळाच्या महागणपतीची ही मूर्ती कापसाचा धागा, लेस आणि सुती गोंडा वापरून बनवली आहे.
-
भायखळ्यातील मकबा चाळ (त्रिवेणी अपार्टमेंट) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, यंदाही जोरदार तयारी करत आहे.
-
या महागणपतीचे सुंदर लोभस रुप पाहून मन प्रसन्न होत आहे.
-
आज या महागणपतीची मूर्ती साकारणारे मूर्तिकार अंतिम टप्प्याचे काम करताना दिसले.

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल