-
गणेश चतुर्थी हा भारतीयांचा एक प्रमुख सण आहे. यंदा ७ सप्टेंबरला म्हणजेच आज गणेश चतुर्थी साजरी होत आहे. आज देशभरातील घराघरात आणि मंडळांमध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना होणार आहे. देशभरात १० दिवस गणेश उत्सव सुरू राहणार असून अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करून निरोप दिला जाणार आहे. (PTI Photo)
-
दरम्यान, देशभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पण, महाराष्ट्रात या उत्सवाचे सौंदर्य वेगळे आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये भव्य गणपती उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवाची तयारी उत्सवाच्या अनेक दिवस आधीपासून सुरू होते. गणपतीचे भव्य आणि आगळेवेगळे रूप पाहण्यासाठी लोक दूरवरून महाराष्ट्रात येतात.आज आपण मुंबईतील प्रसिद्ध अशा गणेश मंडळांबद्दल जाणून घेऊयात. (PTI Photo)
-
चिंचपोकळीचा चिंतामणी
‘चिंचपोकळी चा चिंतामणी’ या नावाने प्रसिद्ध असलेले हे मंडळ १९२० सालापासून या गणपतीची स्थापना करत आहेत. मुंबईतील चिंचपोकळी येथील दत्ताराम लाड मार्ग येथे तुम्ही या बाप्पाचे दर्शन घेऊ शकता. (Photo Source: @chinchpoklichachintamani/instagram) -
गिरगावचा राजा
‘गिरगाव चा राजा’ या गणपतीची स्थापना १९२८ सालापासून केली जाते. मुंबईतील गिरगाव येथील एस.व्ही.सोवनी मार्ग येथील हे मंडळ अतिशय प्रसिद्ध आहे. (Photo Source: @girgaoncharaja/instagram) -
लालबागचा राजा
मुंबईतील लालबागचा राजा हे मंडळ १९३४ पासून अविरतपणे लालबाग मार्केट, जीडी गोएंका रोड, मुंबई येथे भव्य बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करते. (PTI Photo) -
GSB गणपती
१९५५ पासून कटक रोड, वडाळा, मुंबई येथील द्वारकानाथ भवन येथे भव्य गणपती उत्सव आयोजित केला जातो. हा गणेशोत्सव जीएसबी सेवा मंडळाकडून आयोजित केला जातो. ‘गोल्ड गणेश’ या नावानेही येथील बाप्पा प्रसिद्ध आहे. (PTI Photo) -
खेतवाडीचा राजा
‘खेतवाडीचा राजा’ नावाचे मंडळ १९५९ पासून दरवर्षी मुंबईतील ग्रँट रोड, खंबाळा गल्लीमध्ये गणपती उत्सव साजरा करत असते. या मंडळाचे वैशिष्ठ्य म्हणजे येथील बाप्पााच्या मूर्तीचा आकार १९५९ पासून एकसारखाच ठेवला जातो. (Photo Source: @khetwadicharaja/instagram) -
अंधेरीचा राजा
मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे ‘अंधेरीचा राजा’ नावाचे गणेश मंडळ हा गणपती उत्सव आयोजित करते. येथे १९६६ पासून गणपती मूर्तीची स्थापना केली जाते. (Photo Source: @andhericharajatm/instagram) -
फोर्टचा इच्छापूर्ती गणेश
मुंबईतील फोर्टमधील कबूतरखान्याजवळ ‘फोर्टचा इच्छापूर्ती गणेश’ या नावाने प्रसिद्ध असलेले गणेश मंडळ आहे. १९८२ पासून येथे भव्य गणेशोत्सव आयोजित केला जातो. (Photo Source: @fortchaicchapurti/instagram)

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल