-
गणेश चतुर्थीचा पवित्र सण देशभरात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात गणेश चतुर्थीला भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. (पीटीआय फोटो)
-
सकाळपासूनच ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष घरोघर, मंदिरे, मंडपांमध्ये ऐकू येत असून संपूर्ण वातावरण भक्ती आणि श्रद्धेने निनादून निघाले आहे. (पीटीआय फोटो)
-
मंदिरांमध्ये गणपतीच्या विशेष आरतीचे आयोजन करण्यात येत असून बाजारपेठांपासून मंदिरापर्यंत सर्वत्र भाविकांची गर्दी दिसून येत आहे. (पीटीआय फोटो)
-
घरोघरी आणि मंडपांमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या थाटामाटात केली जात आहे. चला पाहूया देशभरातील गणपती बाप्पाची ही सुंदर छायाचित्रे. (पीटीआय फोटो)
-
या फोटोमध्ये सातारा जिल्ह्यातील कराड येथे गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी भाविक गणेशाची मूर्ती मंडपाकडे घेऊन जाताना दिसत आहेत. (पीटीआय फोटो)
-
कराडमध्ये गणेश चतुर्थी उत्सवाच्या पूर्वसंध्येला गणेशमूर्ती मंडपाकडे नेण्यापूर्वी भाविक काळजी घेताना दिसत आहेत. (पीटीआय फोटो)
-
या चित्रात, मुंबईतील गणेश चतुर्थीला मूर्तीची स्थापना करण्यासाठी मूर्तिकार झाकलेली गणेशाची मूर्ती उघडी करताना दिसत आहेत. (पीटीआय फोटो)
-
हा फोटो मुंबईतील दादरमध्ये गणेश चतुर्थी उत्सवाच्या पूर्वसंध्येला काढलेला आहे, यामध्ये खरेदीदारांची गर्दी दिसत आहे. (पीटीआय फोटो)
-
पुण्यात गणेश चतुर्थीनिमित्ताने एक कुटुंब गणपतीची मूर्ती घेऊन जाताना दिसत आहे. गणपती बाप्पाला घरी घेऊन जाताना कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसतो आहे. (पीटीआय फोटो)
-
हे चित्र नागपुरातील असून त्यात गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीत भक्त गणेशमूर्ती मंडपाकडे नेताना दिसत आहेत. (पीटीआय फोटो)
-
हे चित्र जयपूरचे आहे, ज्यात गणेश चतुर्थीला मोती डुंगरी गणेश मंदिरात भक्त पूजा करताना दिसत आहेत. (पीटीआय फोटो)
-
या फोटोमध्ये, एक महिला कलाकार नवी दिल्लीतील गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान विक्रीसाठी आणलेल्या गणपतीच्या मातीच्या मूर्तीला अंतिम स्पर्श देताना दिसत आहे. (पीटीआय फोटो)
-
या चित्रात गुवाहाटीमध्ये गणेश चतुर्थी उत्सवानिमित्त भाविक प्रार्थना करताना दिसत आहेत. (पीटीआय फोटो)
-
मुंबईच्या लालबागमध्ये गणेश गल्लीच्या राजाचे म्हणजेच गणेशाच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. (पीटीआय फोटो)
-
हे चित्र मुंबईतील गणेश चतुर्थी उत्सवातील सिद्धिविनायक मंदिराचे आहे, ज्यामध्ये भक्त मोठ्या संखेने ‘आरती’मध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. (पीटीआय फोटो)
Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेच्या घरी आली नवी पाहुणी! खरेदी केली आलिशान गाडी, किंमत किती?