-
Ganesh Utsav 2024 Transgender Dhol Tasha: Pathak : पुण्यात जवळपास २०० हून अधिक ढोल-ताशा पथकं आहेत ,ज्यामध्ये अनेक तरुण-तरुणी सहभागी होतात. पण, आता या ढोल-ताशा पथकांमध्ये तृतीयपंथींच्या ढोल-ताशा पथकाचा समावेश झाला आहे. हे फक्त पुण्यातील नव्हे तर भारतातील पहिले ढोल-ताशा पथक ठरणार आहे. (सौजन्य – एक्सप्रेस फोटो पवन खेंगरे)
-
शिखंडी : पहिले तृतीयपंथी ढोल-ताशा पथक
राज्यातील पहिल्या तृतीयपंथी ढोल-ताशा पथकाचे नाव शिखंडी असे ठेवण्यात आलं आहे (सौजन्य – एक्सप्रेस फोटो पवन खेंगरे) -
महाभारतातील एका योद्ध्याच्या नावावरून ‘शिखंडी’ असे नाव देण्यात आले, जी एक राजकुमारी म्हणून जन्मली परंतु एक माणूस म्हणून लढली (सौजन्य – इंस्टाग्राम, shikhandi_dhol_tasha_pathak)
-
ढोल ताशा पथकाची स्थापना सामाजिक कार्यकर्त्या कादंबरी शेख यांच्या संकल्पनेतून करण्यात आली आणि मनस्वी गोयलकर, प्रवीण सोनवणे, प्रितेश कांबळे आणि मन्नत यांनी मार्गदर्शन केले. (सौजन्य – इंस्टाग्राम, shikhandi_dhol_tasha_pathak)
-
“आमच्यापैकी कोणालाच वाद्ये कशी वाजवायची हे माहित नव्हते किंवा आमच्याकडे प्रवेश नव्हता,” संस्थापक सदस्य प्रवीण सोनवणे यांनी शनिवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळासोबत गटाच्या पदार्पणापूर्वी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले. (सौजन्य – इंस्टाग्राम, shikhandi_dhol_tasha_pathak)
-
तृतीयपंथीयांनी एकत्र येऊन स्वत:च ढोल-ताशा वादन शिकले आहे. यंदा पुण्यातील गणेशोत्सवामध्ये पहिल्यांदाच या तृतीयपंथी ढोल-ताशा पथकाने वादन सादर केले. (सौजन्य – एक्सप्रेस फोटो पवन खेंगरे)
-
पुण्यातील प्रसिद्ध ढोल-ताशा पथक नादब्रह्म यांनी खारीचा वाटा उचलला आहे. शिखंडी ढोल-ताशा पथकातील तृतीयपंथी वादकांना नादब्रह्म पथकाने ढोल-ताशा वादनाचे प्रशिक्षण दिले. (सौजन्य – एक्सप्रेस फोटो पवन खेंगरे)
-
२५ जणांच्या या तृतीय पंथीय ढोल ताशा पथकने शनिवारी पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाच्या बाप्पाासमोर वादन सादर केले.(सौजन्य – एक्सप्रेस फोटो पवन खेंगरे)
-
बाप्पासमोर पहिल्यांदा ढोल-ताशा वादन करण्याची संधी मिळाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पाहायला मिळाले. (सौजन्य – इंस्टाग्राम, shikhandi_dhol_tasha_pathak)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”