-
आज गणेश चतुर्थी. बुद्धीची देवता विघ्नहर्ता गणपती बाप्पाचा जन्मदिवस. भारतीय सणांमध्ये गणेश चतुर्थीला सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक स्तरांवर अनन्यसाधारण महत्त्व आहे. दरम्यान,आज देशभरात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सर्वत्र ऐकू येत आहे. मंडळामध्ये गणेशाच्या भव्य मूर्तींची प्रतिष्ठापना केली जात आहे. (फोटो: पीटीआय)
-
चेन्नईमध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान भक्त भगवान गणेशाची प्रार्थना करताना. (फोटो: पीटीआय)
-
हुबळीमध्ये ‘गणेश चतुर्थी’ निमित्त भक्त गणपतीची मूर्ती घेऊन जाताना. (फोटो: पीटीआय)
-
मुंबईमध्ये गणेश चतुर्थीनिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या शासकीय निवासस्थानी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह. (फोटो: पीटीआय)
-
केंद्रीय मंत्री चिराग पासवान गणेश चतुर्थीला गणेशमूर्तीसमोर प्रार्थना केली. (फोटो: पीटीआय)
-
शिवसेना (UBT) नेते उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब गणेश चतुर्थी सणाच्या दिवशी गणपतीबाप्पासमोर प्रार्थना केली. (फोटो: पीटीआय)
-
या छायाचित्रात भक्त गणपती बाप्पाला घरी विराजमान करण्यासाठी घेऊन जात आहेत. (फोटो: रॉयटर्स)
-
हातगाडीवरून लाडक्या बापाला घरी नेताना भाविक. (फोटो: रॉयटर्स)
-
गुवाहाटीमध्ये गणेश चतुर्थी उत्सवाच्या आधी शिल्पकार गणपतीच्या मूर्तीवर अंतिम काम करत आहे. (फोटो: पीटीआय)
-
नवी दिल्लीतील बाजारपेठेत बाप्पाच्या मूर्ती विक्रीसाठी आल्या होत्या.(फोटो: पीटीआय)
-
महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी मुंबईतील राजभवनात गणेश चतुर्थी सणाच्या दिवशी श्रीगणेशाची पूजा केली. (फोटो: पीटीआय)
-
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत गणेश चतुर्थी सणाच्या दिवशी कोथंभी येथे श्री गणेशापुढे ‘आरती’ करताना. (फोटो: पीटीआय)
-
मुंबईत गणेश चतुर्थी सणानिमित्त लालबागचा राजा येथे भाविक गणेशाची पूजा करताना. (फोटो: पीटीआय)
-
मुंबईत गणेश चतुर्थी सोहळ्यात कुटुंबासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. (फोटो: पीटीआय)
-
विजयवाडा येथे गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू. (फोटो: पीटीआय)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही