-
दगडूशेठ गणपती सामूहिक अथर्वशीर्ष पठण संपन्न
-
ओम नमस्ते गणपतये… ओम गणपतये नमः … ‘मोरया, मोरया’च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी रविवारच्या (८ सप्टेंबर) पहाटे एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले.
-
ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांचा सहभाग असलेला गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने झाला.
-
महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला.
-
त्यानंतर ओंकार जप, गणेश जागर गीत आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत आदिशक्तीने गणरायाचे नामस्मरण केले.
-
महिला हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला नमन करीत होत्या. गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेह-यावरील उत्साह ओसंडून वाहत होता.
-
महिला अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची दखल घेत ‘इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड’च्या डॉ. दीपक हरके यांनी ट्रस्टला प्रमाणपत्र प्रदान केले.
-
दगडूशेठ हलवाई गणपतीच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाड्यापर्यंतच्या परिसरात दूरवर अथर्वशीर्ष पठणासाठी आलेल्या महिलांची गर्दी दिसत होती.
-
भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणात आरतीने अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाची सांगता झाली.
-
या उपक्रमाचे यंदा ३९ वे वर्ष होते.
-
“गणपती हा बुद्धीचा देव आहे आणि आपण बुद्धिपूर्वक या देवाला नमस्कार करण्यासाठी आला आहात हे चित्र प्रेरणादायी आहे. बुद्धी हीच शक्ती आहे. गणपती हा शिर्षस्थ देव आहे. त्यामुळे मस्तकामध्ये येणारा विचार महत्त्वाचा आहे. बाहेर परिस्थिती इतकी बदलत आहे की आपण आपली शक्ती जागी केली पाहिजे. देव आपल्या पाठीशी राहील ही श्रद्धा ठेवा.,” असे मत यावेळी ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.
-
पुण्यासह मुंबई, लातूर, कोल्हापूर, नाशिक व महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून आलेल्या महिलांनी उपक्रमात सहभाग घेतला. (सर्व फोटो: लोकसत्ता टीम)
हेही वाचा: Ganesh Chaturthi 2024: शंखनाद, ढोल-ताशा अन् लेझिम! प्रसन्न वातावरणात पुण्यातील पहिले

मासिक पाळी आलेल्या विद्यार्थीनीबरोबर शाळेचं क्रूर कृत्य, आईने व्हिडिओ रेकॉर्ड केल्यामुळे सत्य आलं समोर; चौकशीचे आदेश