-
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये मोठी धामधूम सुरू आहे. या खास प्रसंगी, बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करतात. मोठ्या धूमधडाक्यात बाप्पाला घरी आणले जाते आणि साश्रू नयनांनी निरोप दिला जातो. दरम्यान, अंबानींच्या घरीही गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. या खास क्षणानिमित्त अंबानींच्या घरी बॉलिवूड स्टार्सचा मेळा पाहायला मिळाला. सलमान खान, रेखापासून ते तमन्ना भाटिया पर्यंत दिग्गज इथे उपस्थिती लावताना दिसले. पाहूयात फोटो. (छायाचित्र- जनसत्ता)
-
अंबानींच्या घरी गणेश चतुर्थीच्या सेलिब्रेशनला सलमान खानने हजेरी लावली. यावेळी त्याच्या साधेपणाने त्याच्या चाहत्यांची मने जिंकली. अभिनेता अंबानींच्या घरी पँट आणि शर्टसह चप्पल परिधान केलेला दिसला. सलमानचा साधा लूक पाहण्यासारखा होता. यादरम्यान अभिनेता त्याची भाची अलिजेहसोबत पोज देताना दिसला. (छायाचित्र- जनसत्ता)
-
‘स्त्री २’ मधील ‘आज की रात’ या गाण्यात धमाल केलेली अभिनेत्री तमन्ना भाटिया गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसली. अभिनेत्रीने तिच्या साधेपणाने सर्वांची मने जिंकली. तमन्नाची अफाट सुंदरता या फोटोमध्ये दिसून येत आहे. (छायाचित्र- जनसत्ता)
-
अभिनेत्री अनन्या पांडेने अंबानींच्या घरि हजेरी लावली. अभिनेत्री हेवी वर्क साडीत दिसली. तसेच, अभिनेत्री डीपनेकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिचा लूक पाहण्यासारखा होता. (छायाचित्र- जनसत्ता)
-
मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान अर्जुन कपूर त्याच्या बहिणीसोबत अंबानींच्या घरी स्पॉट झाला. अभिनेता मरून रंगाच्या धोती आणि कुर्त्यामध्ये दिसला. दरम्यान, बहीण अंशुला लाल रंगाच्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. इतकंच नाही तर या दोघांनी वडील बोनी कपूर यांच्यासोबतही पोज दिली. (छायाचित्र- जनसत्ता)
-
दरम्यान, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संजय दत्त पत्नी मान्यता दत्तसोबत अंबानींच्या घरी दिसला. या खास प्रसंगी अभिनेत्याने काळ्या रंगाचा कुर्ता तर पत्नी मान्यताने हिरव्या रंगाचा सूट परिधान केला होता. (छायाचित्र- जनसत्ता)
-
यासोबतच आयुष्मान खुरानानेही अंबानींच्या घरी आपली उपस्थिती नोंदवली. या कार्यक्रमात पत्नी ताहिरा कश्यपसोबत पोहोचला. अभिनेता कुर्तामध्ये तर पत्नी ताहिरा लाल गाऊनमध्ये दिसली. (छायाचित्र- जनसत्ता)
-
९० च्या दशकातील सुंदर अभिनेत्री भाग्यश्रीने तिच्या पतीसोबत अंबानींच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री साडीमध्ये खूपच क्यूट दिसत होती. मोकळ्या केसांनी आणि साध्या मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला होता. (छायाचित्र- जनसत्ता)
-
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अभिनेत्री काजोल जांभळ्या रंगाच्या साडीत पोज देताना दिसली. यावेळी अभिनेत्रीने मोकळ्या केसांसह साध्या स्टाईलमध्ये तिचा लूक पूर्ण केला होता. (छायाचित्र- जनसत्ता)
-
बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखाही यावेळी हजार होत्या. रेखा नेहमी त्यांच्या लूकमुळे चर्चेत असतात. अशा परिस्थितीत गणेश चतुर्थीच्या दिवशी त्या हिरव्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसून आल्या. (छायाचित्र- जनसत्ता)
-
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी यावेळी हजेरी लावली. दोघांचा लूक पाहण्यासारखा होता. सिद्धार्थने केशरी कुर्ता घातला तर कियारा पांढऱ्या नेट लेहेंग्यात दिसली. न्यूड मेकअप आणि केसांमध्ये गजरा घालून कियाराने लूक पूर्ण केला. नवरा-बायको दोघेही एकत्र खूप क्यूट दिसत होते. (छायाचित्र- जनसत्ता)
-
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर राजकुमार राव पत्नी पत्रलेखासोबत अंबानींच्या घरी दिसला. यादरम्यान त्याचा लूक पाहण्यासारखा होता. राजकुमार राव कुर्त्यामध्ये छान दिसत होता, तर अभिनेत्री पत्रलेखाही साडीत कोणाहून कमी दिसत नव्हती. (छायाचित्र- जनसत्ता)
-
अंबानींच्या घरी गणपती बाप्पाच्या पूजेदरम्यान सोनम कपूर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. यावेळी तिचा पती आनंद आहुजाही तिच्यासोबत होता. अभिनेत्रीचा लूक पाहण्यासारखा होता. (छायाचित्र- जनसत्ता)
-
दाक्षिणात्य ते बॉलीवूडपर्यंत अभिनयात आपली क्षमता सिद्ध करणारी अभिनेत्री पूजा हेगडे मरून कलरच्या सलवार-सूटमध्ये दिसली. या सूटमधील अभिनेत्रीच्या साध्या लूकने चाहत्यांची मने जिंकली. (छायाचित्र- जनसत्ता)
-
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सर्वांचे लक्ष वेधले. अभिनेत्री हेवी फ्लोरल प्रिंटेड वर्क असलेल्या पांढऱ्या साडीत दिसली. तिच्यावरून नजर हटवणे खूप अवघड होते. ती खूप गोंडस दिसत होती. तिने पती डॉ नेनेसोबत पोजही दिली. (छायाचित्र- जनसत्ता)
-
अभिनेत्री सारा अली खाननेही अंबानींच्या घरी हजेरी लावली. या सेलिब्रेशनमध्ये अभिनेत्री भाऊ इब्राहिम अली खानसोबत दिसली. यादरम्यान ती हिरव्या, मरून आणि जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसली. यामध्ये ती तिचे एब्स फ्लाँट करताना दिसली. तर इब्राहिमने मरून कुर्ता घातला होता. (छायाचित्र- जनसत्ता)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”