-
सध्या देशामध्ये गणेशोत्सवाची धूम सुरू आहे.
-
विविध नेते, अभिनेते, कलाकार गणेशोत्सव साजरा करत आहेत.
-
गणपती बाप्पाचा आजचा तिसरा दिवस आहे.
-
दरम्यान आज महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.
-
लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी अनेक अभिनेते, राजकीय पुढारी हजेरी लावत असतात.
-
यंदा शरद पवारांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.
-
या दर्शनाचे फोटो त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंना शेअर करताना पवारांनी कॅप्शनही दिलं आहे.
-
काय दिलंय कॅप्शन?
“मुंबईच्या गणेशोत्सवाचं वैभव गिरणगावात पाहायला मिळत. आज कुटुंबीयांसह इथल्या लालबागच्या राजाचं मनोभावे दर्शन घेतलं. बळीराजाच्या आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर लढण्याचं बळ मिळो, अशी लालबागच्या राजाचरणी प्रार्थना केली.” (सर्व फोटो: शरद पवार फेसबुक पेज/ लोकसत्ता संग्रहित)
रामनवमीला निर्माण होतो आहे दुर्मिळ संयोग, ‘या’ ३ राशींच्या लोकांवर होईल प्रभु श्री रामाची कृपा