-
रविवारी अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन केले. दरवर्षीप्रमाणे शिल्पा शेट्टी, तिचा पती राज कुंद्रा आणि कुटुंबातील इतर सदस्य आणि मित्रपरिवाराने गणपती बाप्पााला निरोप दिला. (फोटो: वरिंदर चावला)
-
यावेळी शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा यांची एक भावमुद्रा. (फोटो: वरिंदर चावला)
-
इंस्टाग्रामवर गणपती विसर्जनाचा व्हिडिओ शेअर करत शिल्पा शेट्टीने लिहिले की, “आमच्या बाप्पाला निरोप देणे कधीही सोपे नसते, परंतु जड अंतःकरणाने निरोप द्यावा लागतो, बाप्पा येतो तेव्हा प्रेम, कृतज्ञता आणि भक्तिभावाने त्याची पूजा करतो. पुढचे वर्ष आता कधी येईल? असे झाले आहे.” (फोटो: वरिंदर चावला)
-
अंबानी कुटुंबीयांनीही अँटिलियाचा राजाला निरोप दिला. मुंबईतील भव्य मिरवणुकीत अंबानी कुटुंब आणि मित्रपरिवार एकत्र सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. (फोटो: वरिंदर चावला)
-
अंबानी यांच्या गणपती विसर्जन सोहळ्यात अभिनेत्री शनाया कपूरनेही हजेरी लावली होती. (फोटो: वरिंदर चावला)
-
विसर्जन सोहळ्यात ऑरीनेही हजेरी लावली. (फोटो: वरिंदर चावला)
-
अंबानींच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत अभिनेता मीझान जाफरी डान्स करताना दिसला. (फोटो: वरिंदर चावला)
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या नवविवाहित जोडप्याने गणेश विसर्जनावेळी सर्वांचे लक्ष वेधले. (फोटो: वरिंदर चावला)
-
सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या घरच्या बाप्पालाही काल निरोप देण्यात आला. (फोटो: वरिंदर चावला)
-
सलमान खान आणि कुटुंबातील इतर सदस्य यावेळी आवर्जून हजर होते. (फोटो: वरिंदर चावला)
-
या फोटोमध्ये सलमान खानची भाची आयत आणि इतर मुलांसोबत गणेश आरती करताना दिसत आहे. त्याचबरोबर सलीम खान, अरबाज खान, सोहेल खान, अरहान खान, अलिझेह अग्निहोत्री आणि युलिया वंतूर हे देखील यावेळी सहभागी झाले होते. (फोटो: वरिंदर चावला)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा