-
अनेक सेलिब्रेटी आणि कलाकार दरवर्षी लालबागच्या राजाच्या चरणी दर्शनासाठी येतात. (Photo: Varun Dhawan/Instagram)
-
अभिनेता वरुण धवनही मुंबईतील प्रसिध्द लालबाग राजाच्या दर्शनाला आज पोहोचला. (Photo: Varun Dhawan/Instagram)
-
वरुण धवनसोबत जवान चित्रपटाचा दिग्दर्शक अॅटली देखील उपस्थित झाला होता. (Photo: Varun Dhawan/Instagram)
-
यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनेता वरुण धवनचे स्वागत केले. (Photo: Varun Dhawan/Instagram)
-
वरुण सध्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. (Photo: Varun Dhawan/Instagram)
-
बेबी जॉन हा त्याचा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. (Photo: Varun Dhawan/Instagram)
-
बेबी जॉन चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी देखील लालबागच्या राजाच्या चरणी दर्शनासाठी आल्याचे पाहायला मिळाले. (Photo: Varun Dhawan/Instagram)
-
दरम्यान काल (९ सप्टेंबर) देशाचे गृहमंत्री अमित शाहा यांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. (Photo: Amit Shah/Facebook)
-
तसेच काल सकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही लालबागच्या राजाच्या दर्शनाला हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. (Photo: Sharad Pawar/Facebook)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”