-
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात पाच दिवसांच्या लाडक्या बाप्पाला भाविकांकडून काल (११ संप्टेंबर) निरोप दिला गेला.
-
भाविकांनी ढोल-ताशांच्या गजरात तसेच साश्रू नयनांनी पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला आहे.
-
ही छायाचित्रे मुंबईतील आहेत.
-
दरम्यान, यंदा ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा विराजमान झाले.
-
आज गणपती बाप्पाचा सहावा दिवस आहे.
-
घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे विसर्जन काल पार पडले.
-
मुंबईतील सर्व चौपट्या, तलाव परिसरात विसर्जनासाठी भाविकांनी दुपरपासून गर्दी केली होती.
-
रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते.
-
पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास १५ हजार गणेश मूर्तींचे काल विसर्जन करण्यात आले आहे.
-
दरम्यान, आज गुरुवारी गौरी- गणपतींचे तर उद्या म्हणजे शुक्रवारी सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे.
-
त्यामुळे अजून दोन दिवस चौपाट्यांवर भाविकांची गर्दी असणार आहे.
-
या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे.
-
(सर्व फोटो: लोकसत्ता टीम)

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर