-
काल (११ सप्टेंबर) पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होते.
-
मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेनेही तिच्या पाच दिवसांच्या बाप्पाला काल निरोप दिला आहे.
-
पाच दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर अभिनेत्री खूपच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
-
आगमनावेळी श्रेयाने बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती.
-
बाप्पाला निरोप दिल्यानंतर श्रेयाने काही फोटो सोशल मीडिया वरून शेअर केले आहेत.
-
या फोटोंना अभिनेत्रीने खूपच रंजक असे कॅप्शन दिले आहे.
-
“सांभाळून जा. सोबत दिलेला खाऊ भूक लागली की नक्की खा. खूप लोकांनी त्यांची बकेट लिस्ट तुला सांगितली असेल त्यामुळे वर्षभर तू खूप बिझी असशील, हे माहित आहे मला. त्यामुळे मी तुला खूप त्रास नाही देणार. एकच सांगेल माझ्यावर जे नितांत प्रेम करून जीव टाकतात, त्या सगळ्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य दे आणि इतरांनाही. हे सगळं करताना मात्र स्वतःला जप. ये लवकर पुढच्या वर्षी. तुला खूप प्रेम,” अशा शब्दात अभिनेत्री श्रेया बुगडे ने आपल्या बाप्पाला निरोप दिला आहे.
-
श्रेयाच्या या भावनांना चाहत्यांचे जोरदार प्रेम मिळत आहे.
-
(सर्व फोटो साभार- श्रेया बुगडे इंन्स्टाग्राम)

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे