-
सध्या देशात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे.
-
विविध नेते, अभिनेते, अभिनेत्री लाडक्या बाप्पाची सेवा करत आहेत.
-
विविध ठिकाणी दर्शनासाठी जात आहेत.
-
अशातच आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपतीचे दर्शन घेतले आहे.
-
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पाचरणी सचिन नतमस्तक झाला आहे.
-
यावेळी सचिनच्या हस्ते गणेशाची पूजा अर्चा करण्यात आली.
-
मुख्यमंत्री शिंदेंनी सचिनला शाल, श्रीफळ आणि गणपती बाप्पाची सुरेख मूर्ती देऊन सन्मानित केले.
-
यावेळी खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या तसेच इतर विविध विषयांवर चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.
-
यंदा मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेकांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
-
दरम्यान, यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि इतर नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
-
(Photos Source- Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे/Facebook Page)
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”