-
गणेशोत्सवादरम्यान मुंबई पुण्यात उत्साहाचे वातावरण असते. पुण्यात मानाच्या गणपतींसह लाडक्या बाप्पा म्हणजे दगडूशेठ गणपतीचे दर्शन घ्यायला विसरत नाही.
-
दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. यंदा दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भक्तांची गर्दी झाल्याचे फोटो समोर आले आहेत.
-
दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे यंदा १३२ वर्ष असून त्यांनी जटोली येथील शिव मंदिराचा देखावा साकारला आहे जो पाहण्यासाठी गणेशोत्सव सुरु झाल्यापासून भाविकांनी गर्दी केली होती.
-
दगडूशेठ गणपतीच्या जटोली शिवमंदीराचा देखावा पाहण्यासाठी शेवटचा रविवार असल्याने शिवाजी रोडवर नागरिकांनी तुफान गर्दी केली होती.
-
नवसाला पावणाऱ्या बाप्पाच्या दर्शनासाठी अक्षरश: भक्तांचा महापूर आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
-
एवढी गर्दी असूनही कुठेही धक्का-बुक्की झाली नाही. शिस्तीमध्ये रांगेत लोक उभे असल्याचे दिसते.
-
लाडक्या बाप्पाच्या दर्शनसाठी भक्तांचा महापूर आला आहे.
-
पुणेकरांसह आसपासच्या गाव-शहारातून येणाऱ्या दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे असे दिसते.
-
भाविकांची गर्दी हाताळण्याचे काम पुणेे पोलिसांसह, पोलिस मित्र आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते रात्र-दिवस करत होते. (सर्व फोटो सौजन्य – एक्स्प्रेस फोटो, प्रणव खेंगरे)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा