-
पुण्यात अतिशय उत्साहात श्री गणेश विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे.
-
लक्ष्मी रस्त्यावर ढोल पथकांचा जल्लोष पाहायला मिळतो आहे. मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीला ढोल ताशांच्या गजरात महात्मा फुले मंडई येथून सुरुवात झाली.
-
मिरवणूक पाहायला नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.
-
मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीच्या चित्तवेधक रूपाने सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
-
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मिरवणूक मार्गावर आला असून, त्या पुढील पथकेही लक्षवेधक आहेत.
-
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ गणपती मिरवणूक मार्गावर दाखल झाला आहे.
-
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती
-
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती
-
लक्ष्मी रस्त्यावर मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीसमोर कामायनी पथकाच्या लयबद्ध वादनाने सर्वांची मने जिंकली.
-
लक्ष्मी रस्त्यावर श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेते ते विष्णूनाद शंख पथक. पथकाच्या शंखध्वनीने वातावरणात अतिशय प्रसन्न शंखनाद भरला गेला.
-
विविध ऐतिहासिक वेशभूषा करून लहान मुलेही मिरवणुकीत सहभागी झाली.
-
मिरवणुकीतील आणखी एक खास दृश्य
-
१० दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर भक्तांना गणरायाला निरोप देणे अतिशय कठीण असते.
-
(सर्व फोटो- पुणे लोकसत्ता टीम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”