-
गेल्या काही वर्षांमध्ये स्मार्टफोन्समध्ये अनेक बदल झालेत. कंपन्यांनी आपल्या डिव्हाइसमध्ये दर्जेदार स्पेसिफिकेशन्स द्यायला सुरूवात केली असून कॅमेरा सेटअपमध्येही बरीच सुधारणा केली आहे. आजचे अॅडव्हान्स स्मार्टफोन अनेक हाय-टेक आणि प्रीमियम फीचर्ससह येतात. या फीचर्सशिवाय फोनमध्ये सर्वाधिक आवश्यकता दमदार बॅटरीची असते. सध्या दमदार बॅटरी बॅकअप असलेले अनेक स्मार्टफोन बाजारात आहेत. सतत बॅटरी चार्ज करण्याचं टेन्शन या फोनसाठी अजिबात जाणवत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला येथे 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5000mAh ची दमदार बॅटरी असलेल्या स्मार्टफोन्सबाबत सांगणार आहोत…
-
जिओनी M7 पावर – 5000mAh बॅटरी असलेल्या या फोनमध्ये 1440×720 पिक्सल रिझोल्युशनसह 6 इंच डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा रिअर आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
-
4जीबी रॅम आणि 64जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम MSM8940 प्रोसेसर मिळते. आवश्यकता असेल तर फोनची मेमरी माइक्रो एसडी कार्डद्वारे 256जीबीपर्यंत वाढवता येते.
-
अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर हा फोन 9,478 रुपये आणि फ्लिपकार्टवर 9,399 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
-
आसुस झेनफोन मॅक्स प्रो M1 – 4जीबी रॅम आणि 64जीबीपर्यंत स्टोरेजचा पर्याय असलेल्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे.
-
स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये 5.99 इंच स्क्रीन आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 13 मेगापिक्सल+5 मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल.
-
तर, सेल्फीसाठी यामध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 7,499 रुपये आहे.
-
रिअलमी 5s हा स्मार्टफोन 5000mAh क्षमतेच्या बॅटरीसह येतो.
-
फोनच्या मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेंसरसह एक 8 मेगापिक्सल आणि दोन कॅमेरे 2 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फीसाठी फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.
4जीबी रॅम आणि 64जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर असून हा फोन 9,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. -
व्हिवो U10 हा स्मार्टफोन 3जीबी रॅमसह 32जीबी आणि 64जीबी इंटर्नल स्टोरेजसह येतो.
-
8,990 रुपये बेसिक किंमत असलेल्या या फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. 6.35 इंच डिस्प्ले असलेल्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 665AIE प्रोसेसर आहे.
-
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 13 मेगापिक्सल+8 मेगापिक्सल+2 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा सेटअप आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेटअप मिळेल.
मोटो E5 प्लस – 3जीबी रॅम आणि 32जीबी इंटर्नल स्टोरेजसह येणाऱ्या मोटो E5 प्लसमध्ये स्नॅपड्रॅगन 430 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. -
फोनमध्ये 720×1440 पिक्सल रेझॉल्युशनसह 6 इंच एचडी+ मॅक्स व्हिजन आयपीएस एलसीडी स्क्रीन आहे. 5000mAh बॅटरी असलेल्या या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा रिअर आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
-
अॅमेझॉनच्या संकेतस्थळावरुन हा फोन 7 हजार 499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड