-
भारतात रिलायंस जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा असल्याचं नेहमीच दिसून येतं. आमचं नेटवर्क सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा प्रत्येक कंपनीकडून केला जातो.
-
पण, आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात TRAIने जानेवारी 2020 महिन्याची इंटरनेट स्पीडची क्रमवारी जारी केली आहे. त्यामुळे इंटरनेट स्पीडच्या बाबतीत तुम्ही वापरणारे नेटवर्क किती चांगले आहे? आणि कोणते नेटवर्क खराब आहे? याबाबतची क्रमवारी जाणून घेऊया…
TRAIने जारी केलेल्या क्रमवारीमध्ये डाउनलोड स्पीडच्या बाबतीत टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओने बाजी मारलीये. पण अपलोड स्पीडमध्ये त्यांची बरीच पिछेहाट झाली आहे. व्होडाफोन कंपनी अपलोड स्पीडच्या बाबतीत अव्वल ठरलीये. विशेष म्हणजे… -
-
27.2 एमबीपीएस इतकी घट नोंदवण्यात आल्यानंतरही 20.9 एमबीपीएस डाउनलोड स्पीडसह रिलायंस जिओने या क्रमवारीत अव्वल क्रमांक गाठलाय. त्यानंतर…
-
-
(संग्रहित छायाचित्र)
-
डाउनलोड स्पीडमध्ये तिसऱ्या क्रमांकावर एअरटेलनंतर व्होडाफोनचा नंबर आहे. व्होडाफोनचा डाउनलोड स्पीड 7.6 एमबीपीएस आणि त्या खालोखाल आयडिया आहे.
-
आयडियाचा डाउनलोड स्पीड 6.5 एमबीपीएस इतका नोंदवण्यात आला आहे. व्होडाफोन-आयडिया या दोन्ही कंपन्यांचे विलिनीकरण झाले आहे, पण ट्रायकडून अजूनही दोन्ही नेटवर्कच्या कामगिरीचे आकलन वेगवेगळे केले जाते. कारण..
-
कारण, अद्यापही या दोन्ही कंपन्यांची नेटवर्क एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आता, जाणून घेऊया अपलोड स्पीडमध्ये कशी आहे आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांची कामगिरी? कोण ठरलं अव्वल? –
-
जानेवारी महिन्यात अपलोड स्पीडमध्ये व्होडाफोन कंपनीने 6 एमबीपीएस स्पीडसह चांगली कामगिरी केली असून पहिलं स्थान पटकावलंय. व्होडाफोनच्या खालोखाल …
-
व्होडाफोनच्या खालोखाल अपलोड स्पीडमध्ये आयडियाचा क्रमांक आहे. 5.6 एमबीपीएस अपलोड स्पीडसह आयडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे.
-
त्यानंतर डाउनलोड स्पीडमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या जिओचा क्रमांक लागतो. 4.6 एमबीपीएस स्पीडसह ते तिसऱ्या स्थानी आहेत.
-
टेलिकॉम क्षेत्रात आघाडीच्या सर्व कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा असल्याचं स्पष्ट होतं आहे. पण, डाउनलोड आणि अपलोड स्पीडचा विचार करता जानेवारी महिन्यात जिओ आणि व्होडाफोन या दोन कंपन्या बेस्ट ठरल्या आहेत.

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई