-
आपल्या जठरात आम्ल असतेच. खाल्लेल्या अन्नाचे विघटन करणे, अन्नातील विषाणूंना मारणे आणि अन्नातील सर्व घटक एकत्र करून ते पचनसंस्थेत पुढे सरकण्यास मदत करणे हे त्या आम्लाचे नेहमीचे काम. जठरातील आम्लाचे उत्पादन वाढून जो त्रास होतो, तो म्हणजे अॅसिडिटी (आम्लपित्त). यात जळजळ होणे, पोटात दुखणे ही लक्षणे दिसू शकतात. हे पोटात दुखणेही जळजळ झाल्यासारखे दुखते किंवा तीव्र दुखते. मात्र या अॅसिडिटीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही घरगुती वस्तूंचा वापर करणे शक्य आहे. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी अॅसिडिटी म्हणजे काय याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात…
-
अॅसिडिटीत पोटात तीव्र दुखत असेल तर जठराच्या आतील अस्तर उघडे पडून तिथे अल्सर (व्रण) झालेला असू शकतो. खरे तर जठराचे आतले आवरण मजबूत असते. आम्ल सहन करण्याची क्षमता त्यात असूनही काही वेळा ते अशा प्रकारे फाटू शकते. असा अल्सर होतो तेव्हा त्या ठिकाणच्या नसा उघडय़ा पडतात आणि त्यावर आम्लाची प्रक्रिया होऊन पोटात दुखते.
-
जठरातील आम्ल अन्ननलिकेत आले, तर छातीमागे जळजळ होणे, छाती दुखणे, आंबट ढेकर येणे, तोंडात करपट पाणी येणे, उलटय़ा होणे अशी लक्षणेही दिसू शकतात. याला ‘रीफ्लक्स डिसिज’ म्हणतात. अलीकडे अॅसिडिटीवरील ‘ओव्हर द काऊंटर’ औषधांचा वापर वाढला आहे. अॅसिडिटी झाल्यावर कोणती गोळी किंवा कोणते सिरप घ्यावे हे सर्वाना माहीत असते. अॅसिडिटी क्वचितच झालेली आणि साधी असेल तर हे औषध घेऊन पाहता येईल. पण सततच अॅसिडिटीचा त्रास होत असेल किंवा ती तीव्र स्वरूपाची असेल, तर सारखी ही औषधे घेत राहण्यापेक्षा डॉक्टरांकडून आधी तपासून घेतलेले बरे.
-
अॅसिडिटी जास्त प्रमाणात, सतत आणि खूप दिवस होत राहिल्यास रुग्णाला अन्ननलिकेत, जठरात, लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात जखमा होतात, यालाच अल्सर म्हणतात. या रुग्णांना पचनसंस्थेच्या याच भागांचे कर्करोगदेखील होऊ शकतात.
-
प्रत्येक जळजळ किंवा उलटी ही अॅसिडिटीच असेल असे नाही. पोटात वा छातीत तीव्र किंवा सतत वेदना होणे, वजन कमी होणे, खायची इच्छा कमी होणे, सतत उलटय़ा होणे, उलटी किंवा शौचावाटे रक्त जाणे, शौचास काळ्या रंगाची होणे अशी लक्षणे दिसत असतील, तर मात्र त्याला केवळ अॅसिडिटी समजून दुर्लक्षित करू नका. अशा परिस्थितीत डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायला हवी. काही रुग्णांच्या बाबतीत ही लक्षणे अन्ननलिकेच्या किंवा जठराच्या कर्करोगाची असू शकतात, गाठ झाल्यामुळे किंवा अल्सरची काही गुंतागुंत उद्भवल्यानेही ही लक्षणे दिसू शकतात. अशा परिस्थितीत दुर्बिणीने तपासणी (एण्डोस्कोपी) केली जाते. कोणत्याही रक्ताच्या चाचणीतून अॅसिडिटी वा अल्सर आहे की नाही ते कळत नाही. रुग्णाला तपासून त्याच्या लक्षणांवरूनच निदान होते. सर्वच रुग्णांना चाचण्या लागतही नाहीत. ८० ते ९० टक्के रुग्णांना डॉक्टरांनी सुचवल्यानुसार ठरावीक काळ गोळ्या-औषधे घेऊन बरे वाटते. पण याच अॅसिडिटीवर काही घरगुती उपाय ही आहेत. अॅसिडिटीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरता येतील अशा पाच गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत…
-
तुळस आणि तुळशीचे बी – तुळशीमध्ये अँटी अल्सर घटक असतात. त्यामुळे पोटातील वाढलेली अॅसिडची पातळी कमी होण्यास तुळस अतिशय उत्तम उपाय आहे. तुळशीची पाने चावून खाल्ल्याने अॅसिडीटी कमी होण्यास मदत होते. याशिवाय हल्ली बाजारात तुळशीचे बी सहज उपलब्ध होते. त्याचाही अॅसिडीटी कमी होण्यास उपयोग होतो. तुळस अनेकदा घरात असल्याने ती खाणेही सोपे असते. त्यामुळे पित्ताचा त्रास जाणवत असेल तर ४-५ तुळशीची पाने खावीत किंवा ग्लासभर पाण्यात भिजवलेले तुळशीच्या बीचे पाणी प्यावे.
-
-
दूध – दुधात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळते. पित्ताचा त्रास होत असेल तर थंड दुधाचे सेवन करावे. यामुळे पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते. रात्री झोपताना गार दूध प्यायल्यास पित्ताची तक्रार कमी होते.
-
बडिशेप – बडिशेपही पित्तावर गुणकारी आहे. यात अँटी अल्सर घटक असतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेवरही बडिशेप खाणे हा उत्तम उपाय आहे. त्यामुळे पित्ताची शक्यता वाटत असल्यास त्या व्यक्तींनी बडिशेपचे दाणे चघळावेत.
-
व्हॅनिला आईस्क्रीम – आईस्क्रीममध्ये असणारे घटक अॅसिडीटी कमी करण्यास उपयुक्त असतात. त्यामध्ये असणारा दुधाचा किंवा दुधाच्या पावडरचा अंश अॅसिडीटी कमी करण्यास उपयुक्त ठरतो. त्यामुळे पित्त झाल्याचे समजल्यास लगेचच व्हॅनिला आईस्क्रीम खाणे फायद्याचे ठरते.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख