-
देशाच्या ऑटोमोबाइल इंडस्ट्रीला जून महिन्यात थोडा दिलासा मिळाला आणि मे महिन्याच्या तुलनेत गाड्यांच्या विक्रीत थोडी वाढ झाली. विक्री वाढवण्यासाठी ऑटो कंपन्यांकडून विविध ऑफर दिल्या जात आहेत.
-
जर तुम्ही टाटाची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, टाटा मोटर्स जुलै महिन्यात आपल्या गाड्यांवर 80 हजार रुपयांपर्यंत विविध प्रकारे डिस्काउंट देत आहे. डिस्काउंट ऑफरमध्ये कंपनीच्या वेगवेगळ्या डिलरशिप्सप्रमाणे बदल होऊ शकतो. जाणून घेऊया कोणत्या कारवर किती फायदा?
-
Tata Tigor : टाटाच्या या सब-कॉम्पॅक्ट सिडान कारवर जुलै महिन्यात 50 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. यात 20 हजार रुपये कॅश डिस्काउंट आणि 20 हजार रुपये एक्स्चेंज बोनस आहे. याशिवाय 10 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरिट डिस्काउंटचीही ऑफर आहे.
-
Tata Tigor किंमत : या कारच्या बेसिक मॉडेलची एक्स-शोरुम किंमत 5.75 लाख रुपये आहे.
-
2 – Tata Nexon : कंपनीच्या या शानदार एसयूव्हीवर केवळ कॉर्पोरेट डिस्काउंटची ऑफर आहे. 10 हजार रुपयांपर्यंत या एसयूव्हीवर कॉर्पोरेट डिस्काउंट मिळेल.
-
Tata Nexon किंमत : निक्सॉनच्या बेसिक मॉडेलची एक्स- शोरुम किंमत 6.95 लाख रुपये आहे.
-
3 – Tata Tiago : टाटा मोटर्सच्या या एंट्री लेवल कारवर या महिन्यात 35 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतं. यामध्ये 15 हजार रुपये कॅश डिस्काउंट आणि 10 हजार रुपये एक्स्चेंज बोनस आहे. याशिवाय 10 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट ऑफरही मिळेल.
-
Tata Tiago किंमत : टियागोच्या बेसिक मॉडेलची एक्स-शोरुम किंमत 4.60 लाख रुपये आहे.
-
4 – Tata Harrier : टाटा कंपनी आपल्या या लोकप्रिय एसयूव्हीवर या महिन्यात 80 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. यामध्ये 25 हजार रुपये कॅश डिस्काउंट आणि 40 हजार रुपये एक्स्चेंज बोनस आहे. याशिवाय कंपनी हॅरियरवर 15 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंटही देत आहे.
-
Tata Harrier किंमत : हॅरियरच्या बेसिक व्हेरिअंटची एक्स-शोरुम किंमत 13.69 लाख रुपये आहे.

LSG vs MI: “साधी गोष्ट आहे, संघाला…”, तिलक वर्माच्या रिटायर्ड आऊटवर हार्दिक पंड्याचं मोठं वक्तव्य, मुंबईच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?