-
भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. देशाचे ‘मिसाईल मॅन’ म्हणूनही त्यांना संबोधलं जातं. लोकांचे राष्ट्रपती अशी ओळख असणाऱ्या डॉ. कलाम यांचं २७ जुलै २०१५ रोजी निधन झालं. कलाम यांची भाषणं नेहमीच प्रेरणादायी असत. डॉ. कलाम यांच्या ५ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या काही निवडक भाषणांतील विचार खास लोकसत्ताच्या वाचकांसाठी देत आहोत.
-
जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यात आसरा घेतात. मात्र, गरूड पावसापासून बचाव करण्यासाठी ढगांवरून उडतो.
-
देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरचं सापडतात.
-
यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही.
-
तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका. कारण, दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय केवळ नशीबाचा भाग होता, असे म्हणायला अनेकजण सज्ज असतात.
-
स्वप्न खरी होण्यासाठी स्वप्नं पाहणं गरजेचं आहे.
-
संकुचित ध्येय बाळगू नका. महान विचारदृष्टी समोर ठेऊन परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल.
-
एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते. मात्र, एखाद्याला जिंकणे खूपचं अवघड असते.
-
स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा.
-
यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.
VIDEO: “मी गेली ३ वर्षे…”, शुबमन गिलचा रिलेशनशिपबाबत मोठा खुलासा; सारा तेंडुलकरसह ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान काय म्हणाला?