-
कमी किंमत, उत्तम माइलेज आणि मेंटनेन्ससाठी कमी खर्च यामुळे भारतात बहुतांश लोकांचा 'एन्ट्री लेवल'च्या कार खरेदीकडे कल असतो. त्यामुळे भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक स्वस्त कार उपलब्ध आहेत. जर तुम्हीही कमी किंमतीतील कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी पाच लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येणाऱ्या 10 बेस्ट कार्सबाबत माहिती देत आहोत.
-
1 – Maruti Suzuki Alto : मारुती सुझुकीची ही एन्ट्री लेवलची कार देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. या कारमध्ये 0.8-लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 47 hp पॉवर आणि 69 Nm टॉर्क निर्माण करतं. पेट्रोल इंजिन असलेल्या ऑल्टोचा माइलेज 22.05 किलोमीटर प्रति लिटर आहे. याशिवाय मारुतीची ही कार सीएनजी व्हेरिअंटमध्येही उपलब्ध आहे. सीएनजी ऑल्टोचा माइलेज 31.59 किलोमीटर प्रति किलोग्रॅम आहे.
-
Maruti Suzuki Alto : किंमत – मारुती ऑल्टोची बेसिक एक्स-शोरुम किंमत 2.94 लाख रुपये आहे.
-
2 – Renault KWID : रेनॉची ही छोटी कार मारुती ऑल्टोला टक्कर देण्यासाठी बाजारात उतरवण्यात आली आहे. ही कार दोन इंजिन प्रकाराता येते. यात 54ps पॉवरसह 0.8-लिटर आणि 68ps पॉवरसह 1.0-लिटर पेट्रोल इंजिनचा समावेश आहे. 0.8-लिटर इंजिनचा माइलेज 20.71 किलोमीटर प्रति लिटर आहे. तर, 1.0-लिटर इंजिनचा माइलेज मॅन्युअल ट्रांसमिशनसह 21.74 किलोमीटर आणि एएमटी ऑटोमॅटिक ट्रांसमिशनसह 22 किलोमीटर प्रति लीटर आहे.
-
Renault KWID किंमत : क्विडच्या 0.8-लिटर इंजिन मॉडेलची बेसिक एक्स-शोरुम किंमत 2.94 लाख आणि 1.0-लिटर इंजिन मॉडेलची बेसिक एक्स-शोरुम किंमत 4.16 लाख रुपयांपासून सुरू होते.
-
3 – Datsun redi-GO : क्विडप्रमाणे दॅटसनची ही छोटी कार 0.8–लिटर आणि 1.0-लिटर पेट्रोल इंजिन प्रकारात येते. 0.8 लिटर इंजिन असलेली दॅटसन रेडी-गो 20.71 किलोमीटर प्रति लीटर इतका माइलेज देते. तर, 1.0-लिटर इंजिनमध्ये ही कार मॅन्युअल गिअरबॉक्ससह 21.7 किलोमीटर आणि एएमटी गिअरबॉक्ससोबत 22 किलोमीटर प्रति लिटर माइलेज देते.
-
Datsun redi-GO किंमत : 0.8-लिटर इंजिन मॉडेलची बेसिक एक्स-शोरुम किंमत 2.83 लाख आणि 1.0-लिटर इंजिन मॉडेलची बेसिक एक्स-शोरुम किंमत 4.44 लाख रुपये आहे.
-
4 – Maruti Suzuki S-Presso : पाच लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही मारुतीची ही माइक्रो-एसयूव्ही देखील खरेदी करु शकतात. यात 1.0-लिटर पेट्रोल इंजिन असून हे इंजिन 67 hp पॉवर आणि 90Nm टॉर्क निर्माण करतं. एस-प्रेसोच्या std आणि LXi व्हेरिअंटचा माइलेज 21.4 किलोमीटर आहे. तर, VXi आणि VXi+ व्हेरिअंटचा माइलेज 21.7 किलोमीटर प्रति लिटर आहे. एस-प्रेसो सीएनजी व्हेरिअंटमध्येही येते. सीएनजी प्रकारात या कारचा माइलेज 31.2 किलोमीटर प्रति किलोग्रॅम आहे.
-
Maruti Suzuki S-Presso किंमत : मारुती एस-प्रेसोची बेसिक एक्स-शोरुम किंमत 3.70 लाख रुपयांपासून सुरू होते.
-
5 – Maruti Suzuki Celerio : मारुती सुझुकीची ही कारही 5 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत येते. यामध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 67 hp पॉवर आणि 90 Nm टॉर्क निर्माण करतं. सिलेरियोच्या पेट्रोल मॉडेलचा माइलेज 21.63 किलोमीटर प्रति लीटर आणि सीएनजी मॉडेलचा माइलेज 30.67 किलोमीटर प्रति किलोग्रॅम आहे.
-
Maruti Suzuki Celerio किंमत : मारुती सिलेरियोची बेसिक एक्स-शोरुम किंमत 4.41 लाख रुपये आहे.
-
6 – Maruti Suzuki Wagon R : 5 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत मारुतीची वॅगनआर देखील उपलब्ध आहे. ही कार 1-लिटर आणि 1.2-लिटर अशा दोन पेट्रोल इंजिन प्रकारात येते.
-
Maruti Suzuki Wagon R किंमत : मारुती वॅगनआरची बेसिक एक्स-शोरुम किंमत 4.45 लाख रुपयांपासून सुरू होते.
-
7 – Hyundai Santro : पाच लाखापेक्षा कमीमध्ये ह्युंडाई कंपनीची सँट्रो कारही खरेदी करता येईल. यात 1.1-लिटर क्षमतेचं इंजिन असून 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचे पर्याय मिळतात.
-
Hyundai Santro किंमत : सॅंट्रोची बेसिक एक्-शोरुम किंमत 4.57 लाख रुपये आहे.
-
8 – TATA Tiago : टाटा मोटर्सची ही एंट्री लेवल कार 5 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. यात 1.2-लिटर पेट्रोल इंजिन आहे . हे इंजिन 86 ps ची पॉवर आणि 113 Nm टॉर्क निर्माण करतं.
-
TATA Tiago किंमत : टाटा टियागोची बेसिक एक्स-शोरुम किंमत 4.60 लाख रुपये आहे.
-
9 – Maruti Suzuki Ignis : मारुती सुझुकीची ही प्रीमियम एंट्री-लेवल कार देखील 5 लाखापेक्षा कमी किंमतीत येते. यात 1.2-लिटर पेट्रोल इंजिन असून ही कार 20.89 किलोमीटर प्रति लीटर माइलेज देते असा कंपनीचा दावा आहे.
-
Maruti Suzuki Ignis किंमत : मारुती इग्निसची बेसिक एक्स-शोरुम किंमत 4.89 लाख रुपये आहे.
-
10 – Renault Triber : रेनॉची ही छोटी 7-सीटर सब-कॉम्पॅक्ट एमपीव्ही देखील 5 लाखापेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल. यात 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 72PS पॉवर आणि 96NM टॉर्क निर्माण करतं. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो.
-
Renault Triber किंमत : रेनॉ ट्राइबर या सब-कॉम्पॅक्ट एमपीव्हीची एक्स-शोरुम किंमत 4.99 लाख रुपये आहे.

Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा