-
अलिकडच्या काळात कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किंमती कमी केल्याचं क्वचितच ऐकायला येतं. पण Mahindra ने नुकतीच आपल्या एका दमदार एसयूव्हीच्या किंमतीत कपात केली आहे.
-
Mahindra ची लोकप्रिय सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही XUV300 स्वस्त झाली आहे. कंपनीने या दमदार एसयूव्हीच्या किंमतीत घसघशीत कपात केली आहे.
-
कंपनीकडून किंमतीत कपात करण्यामागे कोणतं कारण सांगण्यात आलेलं नाही, पण मार्केटमध्ये किया मोटर्सची आगामी येऊ घातलेली नवीन किया सोनेट आणि टोयोटा अर्बन क्रूजर यांच्यामुळे एक्सयूव्ही300 च्या किंमतीत कपात झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
-
गेल्या आठवड्यातच किया मोटर्सने आपल्या सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही किया सोनेटवरुन पडदा हटवल्यानंतर आता महिंद्राकडून एक्सयूव्ही 300 च्या किंमतीत कपात झाली आहे.
-
Mahindra XUV300 च्या डिझेल मॉडेल (W4 आणि W6 व्हेरिअंट्स )वगळता अन्य सर्व व्हेरिअंट्सची किंमत कमी झाली आहे.
-
Mahindra XUV300 ची किंमत 87 हजार 129 रुपयांनी कमी झाली आहे. सर्वाधिक कपात पेट्रोल मॉडेलच्या किंमतीत झाली आहे.
-
पेट्रोल मॉडेलच्या किंमतीत सर्वाधिक कपात : महिंद्रा XUV300 च्या पेट्रोल मॉडेल W8 (O)व्हेरिअंटची किंमत सर्वाधिक 87 हजार 129 रुपयांनी कमी झाली आहे.
-
महिंद्रा XUV300 W8 (O)व्हेरिअंटच्या खालोखाल महिंद्रा XUV300 (W8) व्हेरिअंटच्या किंमतीतही 70 हजार रुपयांची कपात झाली आहे.
-
याशिवाय महिंद्रा XUV300 (W6) ची किंमत 17 हजार रुपयांनी कमी झाली आहे.
-
तसेच, कंपनीने महिंद्रा XUV300(W4) व्हेरिअंटची किंमतही 35 हजार रुपयांनी कमी केली आहे.
-
डिझेल मॉडेलच्या किंमतीत काय बदल ? : एसयूव्हीच्या डिझेल मॉडेल W8 व्हेरिअंटची किंमत 20 हजार रुपये आणि W8 (O) व्हेरिअंटची किंमत 39 हजार रुपयांनी कमी झाली आहे.
-
दुसरीकडे, डिझेल मॉडेलच्या W6 आणि W4 व्हेरिअंट्सच्या किंमतीत मात्र अनुक्रमे 20 हजार रुपये आणि 1 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
-
महिंद्रा XUV300 मध्ये 1.2-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5-लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनचे पर्याय मिळतात. पेट्रोल इंजिन 110 bhp पॉवर आणि 200 Nm टॉर्क निर्माण करतं. तर, डिझेल इंजिन 115 bhp पॉवर आणि 300 Nm टॉर्क निर्माण करतं.
-
दोन्ही इंजिनसोबत 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्डचा पर्याय आहे. याशिवाय, डिझेल इंजिनसोबत 6-स्पीड AMT गिअरबॉक्सचाही पर्याय आहे.
किंमतीत झालेल्या कपातीनंतर आता महिंद्रा XUV300 या सब कॉम्पॅक्ट एसयूव्हीची एक्स-शोरुम किंमत 7.95 लाख ते 11.75 लाख रुपयांदरम्यान झाली आहे. तर, आधी या गाडीची किंमत 8.30 लाख ते 12.14 लाख रुपयांदरम्यान होती. जाणून घेऊया सर्व व्हेरिअंट्सची नवीन एक्स-शोरुम किंमत : W4 पेट्रोल – 7.95 लाख रुपये (35 हजार रुपये कपात), W6 पेट्रोल – 8.98 लाख रुपये (17 हजार रुपये कपात), W8 पेट्रोल – 9.90 लाख रुपये (70 हजार रुपये कपात), W8 ऑप्शनल पेट्रोल – 10.97 लाख रुपये (87,129 रुपये कपात), W4 डिझेल – .70 लाख रुपये (1 हजार रुपये वाढ), W6 डिझेल- 9.70 लाख रुपये (20 हजार रुपये वाढ), W8 डिझेल-10.75 लाख रुपये(20 हजार रुपये कपात), W8 ऑप्शनल डिझेल- 11.75 लाख रुपये (39 हजार रुपये कपात). (सर्व फोटो : auto.mahindra.com)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख