-
अनेक जणांना गोड पदार्थ प्रचंड आवडतात. मात्र वजन वाढेल किंवा शरीरातील साखरेचं प्रमाण वाढेल या भीतीने काही जण गोड पदार्थ खाण्याचं टाळतात. परंतु, साखरेला पर्याय म्हणून गुळ किंवा मध यांच्याकडे पाहिलं जातं. पदार्थाची गोडी वाढविणाऱ्या या पदार्थांचे काही गुणकारी फायदेदेखील आहेत. यातच मधाविषयी जाणून घ्यायचं झालं तर मध हा अत्यंत गुणकारी आहे. अगदी भूक वाढविण्यापासून ते पचनशक्ती सुधारण्यापर्यंत मधामुळे अनेक शारीरिक फायदे होतात. त्यामुळे मध खाण्याचे नेमके फायदे काय हे जाणून घेऊयात.
-
मधाच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
-
मधामुळे पचनशक्ती वाढते.
-
मधामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो.
-
मधामुळे रक्त शुद्ध होते.
-
डोळ्यांशी निगडीत तक्रारी असल्यास गाजराचा रस आणि मध एकत्र करुन त्याचं सेवन करावं.
-
अनेक जणांना भूक न लागण्याी समस्या असते. अशा व्यक्तींनी मधाचं सेवन करावं. मधामुळे भूक वाढते.
-
पोटदुखी, मळमळ होत असल्यास आल्याचा रसात किंवा लिंबाच्या रसात मध मिसळून ते खाल्ल्यास पोटदुखी कमी होते.
-
हिवाळ्यात अनेकदा सर्दी, खोकला,पडसं अशा तक्रारी उद्भवल्याचं पाहायला मिळतं. या तक्रारींवर कोमट पाण्यात २ चमचे मध घालून ते पाणी प्यावे. यामुळे बराच फरक पडतो.
-
खरुज किंवा अन्य त्वचेसंबंधित तक्रारी असल्यास एक ग्लास पाण्यात एक चमचा मध घालून ते पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यावं.
-
केसांच्या वाढीसाठी मध फायदेशीर आहे.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल