-
कोट्यवधी युझर्स हल्ली व्हॉट्सअॅपचा वापर करत असतात. त्यामुळे अनेकदा अनेकांच्या मनात आपले मेसेजेस लीक तर होत नाहीयेत ना असा प्रश्न असतो. व्हॉट्सअॅपनं भलेही एन्ड टू एन्ड इन्क्रिप्शनचा पर्याय दिला असेल. परंतु छोटासाही निष्काळजीपणा आपल्याला भारी पडू शकतो.
-
व्हॉट्सअॅप वर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करणं आणि फिंगरप्रिन्ट लॉकही सुरू ठेवण्यासारखी कामं त्वरित केली पाहिजे.
-
यासर्वांव्यतिरिक्त सात अशा महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या तुमच्यासाठी जाणून घेणं अधिक महत्त्वाचं आहे.
-
व्हॉट्सअॅपवर मेसेजेस रिस्टोअर करण्यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे चॅट्स बॅकअप. परंतु चॅट्स बॅकअप हेदेखील पूर्णपणे सुरक्षित नाही. व्हॉट्सअॅप केवळ आपल्याच प्लॅटफॉर्मवर एन्ड टू एन्ट इनक्रिप्शनची सुविधा देतो. गुगल ड्राईव्ह किंवा आय क्लाऊडवर सेव्ह करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅप चॅटचा बॅकअप इनक्रिप्टेड नसतो. त्या मेसेजेसपर्यंत कोणालाही पोहोचणं शक्य आहे.
-
व्हॉट्सअॅपवर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करणं आवश्यक असतं. त्यानंतर यावर ६ अंकांचा पिन सेट होतो. त्याच्या सहाय्यानं अकाऊंटमध्ये पुन्हा किंवा डिव्हाईसमध्ये लॉग इन करणं शक्य आहे. कोणी सिमकार्ड क्लोन करूनही व्हॉट्सअॅप अकाऊंटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तरी तिथपर्यंत पोहोचणं शक्य नसतं.
-
पिन सेट केल्यानंतर व्हॉट्सअॅप युझरकडून त्याचा ईमेल अकाऊंट मागितला जातो. 2FA पिन विसल्यानंतरही त्याद्वारे आपल्याला अकाऊंट अॅक्सेस करता येतो. परंतु चुकीचा ईमेल आयडी टाकल्यानंतर अकाऊंट लॉकदेखील होऊ शकतो.
-
कोणत्याही परिस्थितीत जर व्हॉट्सअॅप चॅट ईमेलवर पाठवून सुरक्षित ठेवण्याच्या विचारात असाल तर एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. असं केल्यानंतर एन्ड टू एन्ड इनक्रिप्शनचा उपयोग होत नाही. कोणताही व्यक्ती तुमचे ते चॅट वाचू शकतो.
-
कोणत्याही अन्य डिवाईसच्या मदतीनं व्हॉट्सअॅप चॅट बॅकअपचा डेटाबेस शेअर केला जाऊ शकतो. व्हॉट्सअॅपच्या फोल्डरमध्ये असलेल्या फाईल्स कॉपी-पेस्ट आणि स्टोअरही करता येऊ शकतात.
-
जर तुम्ही आपले चॅट डिलीट करू इच्छिता तर तुमचे चॅट सहजरित्या डिलीट होतील. परंतु अॅपमध्ये तसं शक्य होणार नाही. व्हॉट्सअॅप फोल्डरमध्ये जाऊन डेटाबेसवर टॅप करत ते डिलीट केल्यास ते पूर्णपणे डिलीट होऊ शकतात. या व्यतिरिक्त तुम्ही गुगल बॅकअपही बंद करू शकता.
-
जर तुम्ही अँड्रॉईडवरून आयफोनवर येणार असला तर जुनं व्हॉट्सअॅप विसरून जा. व्हॉट्सअॅप ऑफिशिअली चॅट बॅकअप ट्रान्सफरला आयफोन आणि अँड्रॉईडमध्ये सपोर्ट करत नाही. अनेक अॅप ते करत असल्याचा दावा करतात. तरीही त्यापैकी अनेक अॅप काही काम करत नाहीत.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं