पुढील काही दिवसांमध्ये भारतामध्ये सण व उत्सवाचा माहोल येईल. यादरम्यान तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास आण्ही तुम्हाला सप्टेंबर २०२० मध्ये स्वस्त झालेल्या स्मार्टफोनची माहिती सांगणार आहोत. सप्टेंबर २०१३ मध्ये १३ स्मार्टफोन जवळपास ४ हजार रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहेत. यामध्ये Samsung, Realme, OnePlus आणि Vivo सारखे ब्रँडचाही समावेश आहे. पाहूयात कोणते आहेत स्मार्टफोन्स… Samsung Galaxy A71 Price in India : सप्टेंबर महिन्यात या स्मार्टफोनची किंमत दोनवेळा कमी झाली आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजवाला स्मार्टफोनची किंमत २९,४९९ झाली आहे. आधी याची किंमत ३२ हजार ९९९ रुपये होती. म्हणजेच सप्टेंबर महिन्यात Samsung Galaxy A71 या स्मार्टफोनची किंमत तीन हजार ५०० रुपयांनी कमी झाली आहे. Realme 6 Price in India : ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत १३, ९९ रुपये तर ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत १४ हजार ९९९ रुपये इतकी आहे. तसेच सहा जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटच्या स्मार्टफोन्सची किंमत १५, ९९९ रुपये इतकी झाली आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १६ हजार ९९९ इतकी झाली आहे. Realme 6 च्या सर्वच व्हेरिएंटच्या स्मार्टफोन्सवर एक हजार रुपयांची सूट मिळाली आहे. OnePlus 7T Pro Price in India : 8 जीबी रॅम/256 जीबी स्टोरेज असणाऱ्या या व्हेरिएंटची किंमत 43,999 रुपये इतकी झाली आहे. याआधी हा स्मार्टफोन ४७ हजार ९९९ रुपयांना होता. म्हणजेच या स्मार्टफोन्सची किंमत ४००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. Realme 6i Price in India : 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १३ हजार ९९९ इतकी आहे. हा फोन पूर्वी १४ हजार ९९९ रुपयांना मिळत होता. Vivo Y50 Price in India : 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६ हजार ९९० इतकी झाली आहे. या फोनची किंमत १७ हजार ९९० रुपये होती. Vivo S1 Pro Price in India : 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची सध्या १९ हजार ९९० रुपये किंमत आहे. या स्मार्टफोनची किंमत एक हजार रुपयांनी कमी झाली आहे. Samsung Galaxy A51 Price in India : या स्मार्टफोनची किंमत १५०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. सहा जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत २२ हजार ९९९ रुपये झाली आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटी किंमत २२ हजार इतकी आहे. Samsung Galaxy A21s Price in India : ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १४ हजार ९९९ रुपये तर 6 जीबी रॅम/64 जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १४ हजार ४९९ रुपये झाली आहे. ४ जीबी असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १५०० रुपयांनी तर सहा जीबी असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १०० रुपायांनी स्वस्त झाली आहे. Samsung Galaxy A31 Price in India : १००० रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर 6 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज असणार्या व्हेरिएंटची किंमत १९९९९ रुपये झाली आहे. Galaxy M01s Price in India : या स्मार्टफोन्सची किंमत ५०० रुपयांनी कमी झाली आहे. सध्या हा स्मार्टफोन ९ हजार ४९९ रुपयांना मिळतोय. Samsung Galaxy M01 Core Price in India : या स्मार्टफोन्सच्या दोन्ही व्हेरिएंटची किंमत ५०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. 1 जीबी रॅम और 16 जीबी स्टोरेज व्हेरिएंट आणि 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असणाऱ्या या स्मार्टफोन्सची किंमत अनुक्रमे ४९९९ आणि ५९९९ इतकी झाली आहे. Samsung Galaxy M01 Price in India : 3 जीबी रॅम/32 जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत एक हजार रुपयांनी स्वस्त होऊन ८९९९ इतकी झाली आहे. Samsung Galaxy M11 Price in India : 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ५०० रुपयांनी कमी झाली आहे. हा स्मार्टफोन सध्या १० हजार ४९९ रुपयांना मिळतोय. 4 जीबी रॅम/64 जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ११ हजार ९९९ इतकी झाली आहे. हा स्मार्टफोन एक हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं