-
भारतात मारूतीच्या कार्स सर्वात लोकप्रिय आहेत. त्यामागे अनेक कारणं असतीलही. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधअये मारूती सुझुकीनं आपली कॉम्पॅक्ट एसयूव्ही Vitara Brezza लाँत केली होती.
-
मारूतीच्या या कारनं सर्व रेकॉर्ड तोडून एक इतिहास रचला आहे. या कारनं अगदी कमी कालावधी ५.५ लाख गाड्यांच्या विक्रीचा टप्पा पार केला आहे.
-
कंपनीनं २०१६ मध्ये ही का लाँच केली होती. त्यानंतर २०२० मध्ये ऑटो एक्सपोदरम्यान त्याचं फेसलिफ्ट व्हर्जन २०२० प्रदर्शित केलं होतं.
-
मारूतीची ही कार यापूर्वी डिझेल व्हेरिअंट सोबत येत होती. परंतु देशात बीएस ६ लागू झाल्यानंतर कंपनीनं या कारचे डिझेल व्हेरिअंट बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
-
Brezza च्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये झालेला सर्वात मोठा बदल म्हणजे यातील इंजिन. नवी Brezza बीएस-६ कम्प्लायंट १.५-लिटर पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध असेल, आतापर्यंत ही कार १.३-लिटर डिझेल इंजिनमध्येही यायची.
-
फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये डिझेल इंजिन मिळणार नाही. कारण, भारतात एप्रिल २०२० पासून बीएस-६ मानक लागू झाल्यानंतर डिझेल इंजिनच्या कार बंद करण्याची घोषणा यापूर्वीच मारुतीने केली होती.
-
Brezza च्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये असलेले इंजिन आणि मारुतीच्या सियाजमधील इंजिन सारखेच आहे. हे १.५-लिटर K15B पेट्रोल इंजिन १०३ bhp ची ऊर्जा आणि १३८ Nm टॉर्क निर्माण करते. यासोबतच ५-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायही मिळतो.
-
ऑटोमॅटिक गिअरबॉक्सच्या व्हेरिअंटमध्ये मारुतीच्या स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजीचाही वापर केला जाणार आहे. मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत या कारचे मायलेज १७.०३ किलोमीटर, तर स्मार्ट हायब्रिडसोबत येणाऱ्या ऑटोमॅटिक ट्रांसमिशन व्हेरिअंटचे मायलेज १८.७६ किलोमीटर प्रतिलीटर आहे.
-
अपडेटेड फीचर : नव्या Brezza च्या कॅबिनमध्ये नवीन ७-इंच स्मार्टप्ले स्टूडियो इन्फोटेन्मेंट सिस्टिम आहे. ही इन्फोटेन्मेंट सिस्टिम आता लाइव्ह ट्रॅफिक अपडेट, व्हॉइस रिकग्निशन, व्हेइकल अलर्ट आणि क्युरेटेड ऑनलाइन कॉन्टेंटसोबत येते. याशिवाय इन्फोटेन्मेंट सिस्टिम पहिल्याप्रमाणे अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार-प्ले सपोर्ट करतो.
-
मार्केटमध्ये नव्या Brezza ची स्पर्धा टाटा नेक्सॉन, ह्युंदाई व्हेन्यू, महिंद्रा एक्सयूवी ३०० आणि फोर्ड इकोस्पोर्ट यांसारख्या एसयुव्हींसोबत आहे.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं