-
सणासुदीच्या कालावधीमध्ये फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनने ग्राहकांसाठी विशेष सेलचे आयोजन केलं आहे. या दोन्ही कंपन्यांचे सेल अनुक्रमे १६ आणि १७ ऑक्टोबरपासून सुरु होत आहेत. फ्लिपकार्टचा बहुप्रतिक्षीत ‘बिग बिलियन डेज सेल’ १६ ऑक्टोबरपासून तर अॅमेझॉनचा 'द ग्रेट इंडियन सेल' १७ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.
-
आठवडाभर हे सेल सुरु असणार आहे. याच सेल निमित्त दोन्ही कंपन्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांशी टायअप केलं आहे. या दोन्ही कंपन्याने अनेक बँका आणि अर्थसहाय्य करणाऱ्या कंपन्यांबरोबर विशेष डील केलं असून याचा ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. यामध्ये अगदी सूट देण्यापासून ते अर्थसहाय्य करण्यापर्यंत आणि थेट पैसे नंतर देण्याच्या पर्यायापर्यंत अनेक योजना आहेत. याचबद्दल आपण जाणून घेऊयात…
-
यावर्षी फ्लिपकार्टने अनेक बँकांच्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स दिल्या आहेत. त्याचबरोबर नो कॉस्ट ईएमआयवरही अनेक गोष्टी ‘बिग बिलियन डेज सेल’मध्ये घेता येतील. कस्टमर ड्युरेबल्स म्हणजेच मोठ्या वस्तू, स्मार्टफोन्स आणि इतर वेगवेगळ्या कॅटेगरीमधील वस्तूंवर कंपनीने ऑपर दिल्या आहेत.
-
मागील वर्षाप्रमाणेच यावर्षी फ्लॅगशिप स्मार्टफोन आणि इलेक्ट्रीक वस्तूंवर मोठी सूट देण्यात आली आहे. कंपनीने इलेक्ट्रॉनिक वस्तू, टीव्ही आणि इतर उपकरणांवर ८० टक्क्यांपर्यंत सूट दिलीय.
-
अनेक वस्तूंवर फ्लॅट डिसाऊण्ट म्हणजे सरसकट ऑफर देण्यात आल्याने ग्राहकांना अगदी स्वस्तात वस्तू खरेदी करता येणार आहे. मात्र त्याचबरोबर कंपनीने अनेक बँकांबरोबर केलेल्या विशेष करारांमुळे ग्राहकांना सूट देण्यात आलेल्या वस्तूंवरही अतिरिक्त सूट देण्यात आलीय.
-
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना बिग बिलियन डे सेलमध्ये खरेदी केल्यास १० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. तर अॅक्सेस बँकेच्या क्रेडिटकार्ड होल्डर्सला पाच टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.
-
पेटीएमच्या युझर्सला अश्यूअर्ड कॅशबॅक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. युपीआय किंवा वॉलेटमधून वस्तूंची किंमत मोजल्यास ही ऑफर लागू होणार आहे.
-
काही थेट ऑफर्स देण्यात आल्या असून काही ऑफर्स या वेगवेगळ्या माध्यमांमधून देण्यात आल्यात. यामध्ये नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय जवळजवळ सर्वच वस्तूंवर देण्यात आलाय.
-
एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, अॅक्सेस बँक, बजाज फिनसर्व्ह यांच्याकडून नो कॉस्ट ईएमआयच्या ऑफर्स फ्लिपकार्टचा बहुप्रतिक्षीत ‘बिग बिलियन डेज सेल’दरम्यान देण्यात आल्यात.
-
ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड नाहीय त्यांच्यासाठी डेबिट ईएमआय पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलाय.
-
एचडीएफसी, अॅक्सेस बँक, फेड्रल बँक, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, झेस्ट मनी यासारख्या बँकांनी डेबिट ईएमआयचा पर्याय दिला आहे.
-
अॅमेझॉनने यंदाच्या सणासुदीनिमित्त अनेक फ्लॅगशिप स्मार्टफोनवर मोठी सूट दिली आहे.
-
लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक गोष्टींवरही अॅमेझॉनने घसघशीत सूट देणार असल्याची घोषणा केली आहे.
-
अॅमेझॉनने 'द ग्रेट इंडियन सेल'मध्ये थेट सूट, कॅशबॅक, नो कॉस्ट ईएमआय, डेबिट कार्ड ईएमआय यासारख्या अनेक ऑफर्सच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करत आणि स्वस्तात मस्त वस्तू उपलब्ध करुन दिल्यात.
-
'द ग्रेट इंडियन सेल'निमित्त अॅमेझॉनने अनेक बँका आणि अर्थसहाय्य करणाऱ्या कंपन्यांशी टायअप केलं आहे. याचा थेट फायदा ग्राहकांना मिळणार आहे.
-
एचडीएफसी बँकेकडून १० टक्के इन्स्टंट डिस्काऊंट देण्यात येणार आहे. क्रेडिट तसेच डेबिट कार्डवर हा डिस्काऊंट देण्यात येणार आहे. एचडीएफसीने ग्राहकांना ईएमआयचा पर्यायही दिला आहे.
-
एचडीएफसीबरोबरच 'द ग्रेट इंडियन सेल'मध्ये इतर बँकांनी क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय दिला आहे.
-
बजाज फिनसर्व्हच्या ईएमआय कार्ड होल्डरला किंवा अॅमेझॉन पे लेटर पर्यायाअंतर्गतही नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलाय.
-
सध्या वस्तूंची गरज आहे मात्र खरेदी करण्यासाठी पैसे नाहीयत त्यांनाही झेस्टमनी तसेच अॅमेझॉन पे लेटरच्या माध्यमातून ईएमआयवर वस्तू विकत घेता येणार आहेत. अॅमेझॉन अॅपवर हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
-
याशिवाय वेगवेगळ्या प्रोडक्टवर अनेक बँकांचे ऑफर्स प्रत्यक्ष साईटवर तसेच अॅपवरही उपलब्ध आहेत.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं