-
आयफोन १२ हा फाइव्ह जी तंत्रज्ञानाला सपोर्ट करणारा फोन असणार आहे. अॅपलने आयफोन १२ मध्ये सहा रंगांचे पर्याय दिले आहेत. तसेच फोनच्या डिस्प्लेला एचडीआर १० तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे.
-
आयफोन १२ हा ड्युएल सीम फोन असणार असून त्यामध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा उपलब्ध असणार आहे. आयफोनचे दुसरे सीम ई-सीम असेल असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. अॅपलच्या या फोनमध्ये ए-१४ बायोनिक प्रोसेसर असणार आहे.
-
कॅमेरामध्ये अल्ट्राव्हाइड मोड, नाइट मोडसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. सर्वच व्हेरिएंटमध्ये नाइट मोड फिचर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. नाइट मोडमध्येही टाइम लॅप्ससारखे फिचर असल्याने युझर्सला फोटो काढणे अधिक सोप्पे होणार आहे.
-
याचबरोबर फोनमध्ये ५० व्हॅटपर्यंत वायरलेस फास्ट चार्जिंगची सोय आहे. वायरलेस चार्जिंगमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आयफोन १२ मध्ये मैगसेफ तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे. आयफोन १२ आणि अॅपल वॉच एकाच चार्जरने चार्ज करता येईल असंही कंपनीने म्हटलं आहे.
-
या फोनची स्क्रीन ५.४ इंचांची असणार आहे. आयफोन १२ चे सर्व फिचर्स या फोनमध्ये असणार आहे. हा जगातील सर्वात पातळ आणि छोटा फाव्ह जी फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
-
हा फोन सहा मीटर खोल पाण्यामध्ये अर्ध्या तासापर्यंत राहू शकतो असं कंपनीने म्हटलं आहे.
-
यामध्ये १२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी स्टोअरेजचा पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये ६.७ इंचाचां वाइड रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. अॅपलच्या या स्मार्टफोनमध्ये ए-१४ बायोनिक प्रोसेसर देण्यात आला असून यामध्ये आयफोन १२ चे इतर फिचर्सही मिळणार आहेत.
-
सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले, १२ मेगापिक्सल अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा, १२ मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्ससारखे फीचर्स आयफोन १२ प्रोमध्ये देण्यात आल्याने त्याला आयपी ६८ मानांकन देण्यात आलं आहे.
-
भारतातील किंमत आयफोन १२ मिनिची भारतातील किंमत ६९ हजार ९९० रुपये असून आयफोन १२ ची किंमत ७९ हजार ९०० रुपये असणार आहे. अॅपलचे हे दोन्ही फोन भारतामध्ये ३० ऑक्टोबरपासून उपलब्ध होतील.
-
याचबरोबर आयफोन १२ प्रो भारतात एक लाख १९ हजार ९९०० ला उपलब्ध होईल. तर आयफोन १२ प्रो मॅक्सच्या १२८ जीबी व्हर्जनची किंमत भारतात एक लाख २९ हजार रुपये इतकी अशेल. हे दोन्ही फोन भारतीय बाजारपेठांमध्ये ३० ऑक्टोबरपासून उपलब्ध होतील. (सर्व फोटो सौजन्य : Apple)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल