Amazon Great Indian Festival 2020 : सण उत्सवामध्ये किंवा त्याआधी मोठ्या डिस्काऊंटमध्ये नवनवीन प्रॉडक्ट्स खरेदी करण्याचा प्रत्येकाचा मानस असतो. Amazon चा Great Indian Festival या सेलची सुरुवात १७ ऑक्टोबरपासून होणार आहे. अॅमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी Great Indian Festival हा सेल २४ तास आधीच सुरु होणार आहे. म्हणजेच प्राइम मेंबर्ससाठी सेल सध्या उपलबद्द झाला आहेय हा सेल पाच दिवस चालणार आहे. या सेलमध्ये मोबाइल फोन्स, अक्सेसरीज आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह अन्य कॅटिगरीजचे प्रॉडक्ट्सवर मोठ्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. पाहूयात… टॉप १० स्मार्टफोन्स डिल्सबद्दल… आयफोन 11 Amazon Great Indian Festival मध्ये ४७ हजार ९९९ रुपयांना उपलबद्ध आहे. सध्या या आयफोनची किंमत ६८ हजार ३०० रुपये इतकी आहे. OnePlus 8 5G हा स्मार्टफोन Amazon Great Indian Festival या सेलमध्ये ३९ हजार ९९९ रुपयांत उपलबद्द आहे. यावर ५ हजार रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. तसेच सहा महिन्याच्या नो कॉस्ट इएमआयवरही फोन खरेदी करु शकता. १६ हजार ९९९ रुपयांचा Redmi Note 9 Pro १२ हजार ९९९ रुपयांना मिळेल. तसेच सहा महिन्याच्या नो कॉस्ट इएमआयवरही फोन खरेदी करु शकता. Samsung चा Galaxy M31s हा स्मार्टफोन १८ हजार ४९९ रुपयांना मिळेल. Redmi Note 9 हा स्मार्टफोन १० हजार ९९९ रुपयांना मिळेल. याची किंमत १४ हजार ९९९ इतकी आहे. Oppo A52 चा 6GB व्हेरिएंटच्या स्मार्टफोन्सवर सहा हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. हा फोन सध्या १३ हजार ९९० रुपयांत मिळेल. शिवाय ९ महिन्याच्या नो कॉस्ट इएमआयवरही फोन खरेदी करु शकता २४ हजार ९९९ रुपयांत iPhone 7 मिळेल. ४३ हजार रुपयांचा Galaxy Note 10 Lite हा स्मार्टफोन्स ३७ हजार ९९९ रुपयांना मिळेल. Mi 10 5G या स्मार्टफोन्सवर दहा हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. सेलमध्ये हा स्मार्टफोन ४४ हजार ९९९ रुपयांना मिळेल. शिवाय या स्मार्टफोन्सवर एक हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंटही देण्यात आला आहे. तसेच १२ महिन्याच्या नो कॉस्ट इएमआयवरही फोन खरेदी करु शकता ३५ हजार ९९० रुपयांचा Reno3 Pro हा स्मार्टफोन या सेलमध्ये २५ हजार ९९० रुपयांना मिळेल. तसेच ९ महिन्याच्या नो कॉस्ट इएमआयवरही फोन खरेदी करु शकता
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं