-
रॉयल एनफिल्डच्या बाईक्सची गोष्टचं निराळी आहे. अनेकदा आपण रॉयल एनफिल्डच्या बाईक्स मॉडिफाय केलेल्या पाहतो. गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर रॉयल एनफिल्डच्या एका कस्टमाईझ्ड बाईकचे काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या बाईकला 'योद्धा' असं नाव देण्यात आलं आहे.
-
नीव मोटरसायकल्सनं रॉयल एनफिल्ड योद्धा ही बाईक मॉडिफाय केली आहे. Thunderbird 350 या बाईकला मॉडिफाय करून योद्धा हे रूप देण्यात आलं आहे. या मॉडिफाईड रॉयल एनफिल्डमध्ये रॉ मेटल फिनिश, एका बाजूला योद्धे वापरत असलेली शिल्डही देण्यात आली आहे.
-
या बाईकचे फिचर्स म्हटले तर यामद्ये ट्वीन हेडलँप, स्टॉक सस्पेन्शन, कस्टम बिल्ट फेंडर्स आणि अपग्रेडेड ब्रेक यांचा समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त फ्यूअल टँक, स्विंगआर्म आणि फ्रेमदेखील मॉडिफाय करण्यात आली आहे. तर दुसरीकडे टँक एक्सटेन्शनचा वापरही करण्यात आला आहे.
-
या बाईकचं रिअर सस्पेन्शन मोनोशॉक युनिटच्या सहाय्यानं अपग्रेड करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे स्ट्रेट हँडलबार मॉडिफाय करण्यात आलं असून डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टरचाही वापर करण्यात आला आहे.
-
मॉडिफाईड रॉयल एन्फिल्ड योद्धामध्ये आफ्टरमार्केट एक्झॉस्ट युनिट आणि K&N एअर फिल्टर देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त २०० सेक्शन रिअर टायरदेखील समाविष्ट आहेत.
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य