सप्ताहाच्या सुरुवातीपासूनच शुभ दीपावली सणाचा उत्साह कायम टिकवून ठेवाल. लक्ष्मी-कुबेर पूजन जणू तुमच्यात बदल घडवणारा दिसेल. चंद्र-गुरूचा शुभयोग चांगला राहील. कलात्मक व्यवसायाला मोठी कलाटणी मिळेल. छोटय़ा व्यवसायाचे स्वरूप मोठय़ा स्वरूपात होईल. अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. भांडवलातून मिळणारा नफा योग्य कारणी लावा. नोकरीमध्ये शुभ पडघम वाजतील. सुधारित योजना अमलात आणाल. परिणामांची तमा न बाळगता केलेल्या कामाचे चीज होईल. धनदायक गोष्टींचा लाभ होईल. अडलेली कामे मार्गी लागतील. मित्र परिवाराकडून शुभेच्छा मिळतील. मुलांची आवडनिवड जपाल. आजोळच्या लोकांचे स्वागत कराल. जोडीदाराची साथ राहील .घरगुती वातावरण आनंदाचे राहील. एकूणच सुखावणारे क्षण अनुभवाल. किरकोळ आरोग्याच्या तक्रारीकडे लक्ष द्या. > शुभ दिनांक : १०, १४ > महिलांसाठी : खूप गडबडीचे वातावरण राहील. गुरुद्वादशी, धनत्रयोदशी या दिवसांसाठी केलेले तुम्ही काही नियोजन यशस्वी करून दाखवाल. लक्ष्मी पूजनाचा आनंद तुमच्या मनाचे पारणे फेडणारा असेल. व्यवसायात मात्र नुसती धावपळ राहील. स्वत: ठरवलेल्या व्यवसायाचे स्वरूप बदलून जाईल. उद्योगधंद्यात अंदाजापेक्षासुद्धा जास्तीची प्रगती दिसून येईल. नोकरीतील दुविधा अवस्थेचे सावट कमी होईल. आतापर्यंत तडजोड केलेला मार्ग काहीतरी चांगले मिळवून देणारा ठरेल. नोकरीतील लवचीकता वाढलेली असेल. आर्थिक फायदा झाला तरी खर्चाचे नियोजन मात्र ढळू देऊ नका. अनावश्यक गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा. सामाजिक क्षेत्रात नवे पाऊल महत्त्वाचे ठरेल. जुन्या मत्रीची अचानक भेट होईल. अध्यात्मातील वारसा कायम जोपासाल. विश्रांतीची गरज भासेल. > शुभ दिनांक : १२, १३ > महिलांसाठी : कामाचे नियोजन आधी ठरवून ठेवा. दिवाळीच्या फराळाची जशी गोडी वाढणार आहे तसाच तुमच्या जीवनात गोडवा येणार आहे. शुभेच्छा भेटी येतील. त्या आनंदाने स्वीकाराल. बरेच दिवस थांबलेले शुभ कार्य घडण्याच्या मार्गी असेल. व्यवसायातील आवक वाढती राहील. व्यावसायिक त्रुटी वेळच्या वेळी लक्षात घ्या. त्यामुळे उद्योगधंद्यातील वाढती उमेद जागृत ठेवावी लागेल. नोकरीत उलथापालथ झाली तरी कामाचे नियोजन तसेच राहील. नवीन नोकरीचा कालावधी सध्या मनाची धावपळ वाढवणारा असेल. पशाचे नियोजन मात्र योग्य करा. सार्वजनिक क्षेत्रात दोन शब्द कमीच बोला. नातेवाईकांशी गोडीचा संवाद साधा. मुलांना सणाचा आनंद लुटू द्या. पण नको ते धाडस करायला लावू नका. जोडीदाराचा सल्ला योग्य मार्गदर्शन करणारा ठरेल. आरोग्य उत्तम राहील. > शुभ दिनांक : ८, १४ > महिलांसाठी : खरेदीचे बेत यशस्वी होतील. या दिवाळी सणात अंधारमय जीवनातून प्रकाश उजळण्याचा प्रयत्न कराल. लक्ष्मी, कुबेर पूजन मोठय़ा आनंदात साजरी कराल. छोटय़ा छोटय़ा गोष्टींतूनसुद्धा जोम वाढणारा दिसेल. व्यवसायात मोठय़ा स्वरूपाची उडी घ्याल. मागणी तसा पुरवठा केल्याने आपोआपच व्यवसायात वाढ होईल. कच्च्या मालाच्या व्यवसायांना मागणी भरघोस मिळेल. नोकरदार व्यक्तींना सुट्टीचे नियोजन आधी करावे लागेल. अचानक अनपेक्षित कामाचा व्याप सांभाळावा लागेल. त्यातूनच पर्यायी गोष्टी स्वीकाराव्या लागतील. योग्य विचारातून प्रगती होईल. आर्थिकदृष्टय़ा योग्य परतावा मिळेल. राजकीय क्षेत्रात नव्याने पदार्पण करण्याची संधी प्राप्त होईल. नातेवाईकांच्या आनंदात सहभागी व्हाल. उपासनेत मन रमेल. मानसिक शांतता लाभेल. आरोग्यतंत्र व्यवस्थित सांभाळाल. > शुभ दिनांक : ८, १० > महिलांसाठी : विशेष असे प्रयत्न सार्थकी लागतील. घरगुती स्तरावर दिवाळी सणाचे औचित्य साधताना तुमचा सक्रिय सहभाग राहील. नरक चतुर्दशी अभ्यंगस्नानाचा आनंद लुटाल. व्यावसायिकदृष्टय़ा मोठय़ा कल्पना प्रत्यक्षात उतरतील. जेमतेम गोष्टी करा. गृहीत धरून केलेले काम यशस्वी होईल. आयात-निर्यात व्यापारात वाढ होईल. व्यवसायातील तुमचे मनसुबे पूर्ण होतील. याचे स्मितहास्य तुमच्या चेहऱ्यावर असेल. नोकरदार व्यक्तींना तांत्रिक अडचणीचा सामना कमी करावा लागेल. महत्त्वाचे निर्णय विचाराने घेतले जातील. आर्थिक साहाय्य चांगले मिळेल. पण कर्ज प्रकरणे सध्या लांबणीवर टाका. मोठय़ा कर्जाची तरतूद करू नका. कौटुंबिक जीवन अनुकूल राहील. धार्मिक गोष्टीतील आवड जोपासताना इतरांची मदत घ्याल. शारीरिक व मानसिक व्यायामाला महत्त्व द्या. > शुभ दिनांक : १०, ११ > महिलांसाठी : योग्य कार्यासाठी केलेली पळापळ सार्थकी लागेल. लक्ष्मी-कुबेर पूजनासाठीची तुमची जय्यत तयारी कराल. घरातील सर्वजण मिळूनमिसळून सणाचा आनंद द्विगुणित कराल. व्यापार उद्योगीकरणाला नवे वळण मिळेल. नवे वळण आघाडीवर पोहोचणारे असेल. तरीही कामाचे ठोकताळे पूर्वीचेच असतील. फक्त नियमात बदल करून घ्यावा लागेल. लांबणीवर असलेली कामे आता पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. मेहनतीस यश मिळेल. नोकरीतील सबबी कमी होतील. सरकारी नोकरदार व्यक्तींना थोडी विश्रांती मिळेल. धावपळीचा कालावधी कमी होईल. धनाविषयीची काळजी मिटेल. हातचे राखून ठेवण्याची सवय उत्तम असेल. सामाजिक आवड निर्माण होईल. मत्रीच्या नात्यांमध्ये स्पष्टपणाचे वक्तव्य राहील. कौटुंबिक स्तरावर सहकार्य उत्तम असेल. अध्यात्मात मन रमेल. आरोग्याचे हित जपा. > शुभ दिनांक : १२, १३ > महिलांसाठी : मानसिक प्रसन्नता टिकवून ठेवा. आतापर्यंत कमी झालेला उत्साह पुन्हा नव्याने जोम घेईल. दिवाळी सणासाठी आकर्षक योजनांची अंमलबजावणी कराल. व्यापारी क्षेत्रातील हालचाली वाढतील. सुरळीत व्यवहार चालू राहतील. ठरलेल्या वेळेत कामाची योग्य अशी तरतूद करता येईल. अनेक प्रकारच्या व्यवहारात गुंतवणूक कराल. ही गुंतवणूक यश मिळवून देणारी असेल. नोकरीतील व्यक्तींना अधिकारपदाची जबाबदारी पार पाडावी लागेल. अधिकारीवर्ग तुमच्या कौशल्याला दाद देईल अशा पद्धतीने काम करा. इतरांवर अवलंबून कोणतेही काम करू नका. पशांच्या बाबतीत कामे होत राहतील. सार्वजनिक कामात बदल झालेल्या गोष्टींचा आढावा घ्या. मत्रीच्या नात्यातील स्नेह दृढ होईल. मुलांचे प्रश्न मार्गी लागतील. कौटुंबिक जबाबदारी पार पाडा. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. >शुभ दिनांक : १०, १४ > महिलांसाठी : विशेष असे पारितोषिक मिळेल. सणासुदीचा आनंद उत्साहाने साजरा कराल. इतरांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना मनातील मळभ दूर ठेवाल. व्यापारी क्षेत्रात सारखे बदलणारे अंदाज लक्षात घ्या. भागीदारी व्यवसायात समजुतीच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. छोटय़ा-मोठय़ा व्यवसायाला प्राधान्य मिळेल. तुमचे उत्पन्न व्यवसाय वाढवणारे असेल. नोकरीचे वाढते कामकाज करताना कामाचा आराखडा प्रथम ठरवून घ्या. आयत्या वेळी गडबड होणार नाही याची काळजी घ्या. वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर असेल. याच गोष्टीसाठी तुम्ही धडपड करीत होता ती आता पूर्ण झाल्याचे समाधान वाटेल. तुमची कामगिरी कौतुकास्पद असेल. आर्थिकदृष्टय़ा स्थिर अवस्था प्राप्त होईल. सामाजिक गोष्टीत पदार्पण होण्याची संधी मिळेल. मित्रांचे सहकार्य उत्तम राहील. प्रकृतिस्वास्थ्य जपा. शुभ दिनांक : १०, ११ महिलांसाठी : भाग्योदयाकडे वाटचाल राहील. या दिवाळसणाला नवीन काही करण्याचा प्रयत्न राहील. लक्ष्मी-कुबेर पूजन कुटुंबासमवेत साजरे कराल. धाडस व कामातील परिश्रम दोन्हीचा मेळ चांगला साधता येईल. व्यावसायिक देवाण-घेवाण करणे सोपे होऊन जाईल. तुमच्या उत्पन्नाला चांगला प्रतिसाद वाढेल. घरगुती व्यावसायिकांना पर्यायी गोष्टींचा आधार मिळेल. व्यावसायिक अंमल चांगला राहील. नोकरदार व्यक्तींना जुन्या कामाचा अनुभव महत्त्वाचा ठरेल. प्रशासकीय व्यक्तींच्या कामकाजात वाढ होईल. नवीन कामात कार्यमग्न राहाल. त्यासाठी मनातील आशा जागृत ठेवा. आर्थिकदृष्टय़ा नियोजन उत्तम राहील. नातेवाईकांना तुमचे सहकार्य मोलाचे ठरेल. मुलांसाठी काही वेळ तुम्हाला राखून ठेवावा लागेल. उपासना फलद्रूप होतील. प्रकृतीचे स्वास्थ्य बिघडणार नाही. > शुभ दिनांक : १०, १४ > महिलांसाठी : खाण्यापिण्यातील रुची वाढेल. नरक चतुर्दशी दिवशी ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घ्याल. व्यावसायिकदृष्टय़ा परिस्थितीशी मिळतेजुळते घेऊन राहावे लागेल. व्यापारी मंडळींनी मर्यादित बाबींचा विचार करायला हवा. फायदा व तोटा याचा हिशोब आधीच केला तर बरेच नुकसान टळेल. व्यापार क्षेत्रात चढ-उतार राहील. नोकरदार व्यक्तींना कामाच्या बाबतीत झालेला गरसमज दूर करण्यात यश मिळेल. अफवांवर विश्वास ठेवू नका. यातच तुमचे हित आहे. आर्थिक अडचण कमी झाली तरी खर्चावर मात्र लगाम घाला. सामाजिक क्षेत्रात योग्य प्रतिसाद राहील. सासुरवाडीकडील नात्यांमधील दुरावा दूर करणे हिताचे राहील. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. मानसिकदृष्टय़ा तणावमुक्त राहा. > शुभ दिनांक : १२, १३ > महिलांसाठी : पाककलेची आवड निर्माण होईल. धार्मिक गोष्टीची आवड निर्माण होईल. दिवाळी मोठय़ा आनंदाने साजरी कराल. चंद्राचे भ्रमण षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे होत असताना मनावरील ताबा सोडू नका. व्यवसायात भावनिक गोष्टींना थारा देऊ नका. व्यावहारिक राहणे हिताचे राहील. अपयश ही यशाची पायरी आहे हे विसरू नका. हातचे राखून ठेवण्याची सवय बदलू नका. सध्या चालू ग्रहस्थितीत नोकरीतील प्रस्ताव लक्षात घ्या. त्यानुसार निर्णय घेणे योग्य ठरेल. कोणतेही नियोजन करण्यापूर्वी अतिरेक टाळा. परिणामांची तीव्रता लक्षात घ्या. अनावश्यक खर्चाचे प्रमाण कमी केले तर आर्थिक घडी विस्कळीत होणार नाही. राजकीय क्षेत्रातील ताणतणाव कमी करा. सासुरवाडीकडील लोकांची मदत मिळेल. इतरांबरोबरच स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्या. > शुभ दिनांक : १०, ११ > महिलांसाठी : मनाची आत्मिक शक्ती वाढवा. दिवाळी सणाची तयारी करताना धावपळ करणे टाळा. शांत चित्त ठेवून काम करा. घरगुती व्यवसायातील आवक वाढेल. त्यासाठी नियोजनात्मक काम करा. मागणी तसा पुरवठा वेळच्या वेळी करावा लागेल. गिऱ्हाईकांची मने दुखावली जाणार नाहीत याची दक्षता घ्या. नोकरदारवर्गाला थोडे कष्ट वाढवावे लागतील. कामातील अडचणी भरून काढाव्या लागतील. प्रत्येक पाऊल घाईघाईने टाकून चालणार नाही. वेळापत्रक आधी ठरवावे लागेल. पशांची बचत करणे हाच आर्थिक मजबुती येण्यासाठी मार्ग आहे. सामाजिक कार्यकत्रे म्हणून जबाबदारी वाढवून घेऊ नका. कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. धर्मपत्नीची साथ उत्तम राहील. आरोग्यावर वेळीच उपचार करा. > शुभ दिनांक : १२, १३ > महिलांसाठी : इतरांचा त्रागा करून घेऊ नका.
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं