-
सणासुदीच्या कालावधीत अनेकांचा कल नव्या वस्तू घेण्याकडे असतो. अनेकदा याच कालावधीत बाईक्स आणि कारच्या खरेदीलाही प्राधान्य देत असतात. तर आज आपण पाहूया काही बजेटमध्ये असणाऱ्या बाईक्स. यामध्ये हीरो, टिव्हीएस आणि बजाजच्या गाड्यांचा समावेश आहे.
-
Hero HF Deluxe : या बाईकची एक्स शोरूम किंमत ४८ हजार ९५० रूपयांपासून ५९ हजार ८०० रूपयांपर्यंत आहे. Hero HF Deluxe मध्ये बीएस ६ ९७.२ सीसी, एअर कुल्ड, ४ स्ट्रोक सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे. ते ७.९४ एचपी पावर आणि ८.०५ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. तसंच यामध्ये ४ स्पीड गिअर बॉक्सही देण्यात आला आहे.
-
TVS Sport: या बाईकमध्ये बीएस ६ ११० सीसी सिंगल सिलिंडर ४ स्ट्रोक, एअर कुल्ड स्पार्क इंग्निशन फ्लूअल इंजेक्टेड इंजिन देण्यात आलं आहे. या गाडीच्या किक स्टार्ट व्हेरिअंटची एक्स शोरूम किंमत ५४ हजार ८५० आणि सेल्फ स्टार्ट व्हेरिअंटची किंमत ५१ हजार ५२५ रूपये इतकी आहे.
-
Bajaj CT 110: या बाईकच्या ES ALLOY व्हेरिअंटची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत ५२ हजार ८९० रूपये इतकी आहे. यामध्ये बीएस ६, ११५ सीसी ४ स्ट्रोक, सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे.
-
Bajaj CT 100: Bajaj CT 100 ही बाईक ES ALLOY आणि KS ALLOY या व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. KS ALLOY च्या व्हेरिअंटची एक्स शोरूम किंमत ४४ हजार ८९० रूपये आहे. तर ES ALLOY या व्हेरिअंटची एक्स शोरूम किंमत ५१ हजार ८०२ रूपये इतकी आहे.
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं