-
एमजी ग्लॉस्टर या भारतातील पहिल्या लेव्हल-१ ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्हीच्या लाँचिंगनंतर अल्पावधीतच २००० बुकिंग्सचा टप्पा गाठला आहे.
-
भारतातील पहिली कनेक्टेड एसुयव्ही एमजी हेक्टर आणि भारतातील पहिली कनेक्टेड इलेक्ट्रिक एसयुव्ही एमजी झेडएस इव्ही नंतर ही एमजीची या श्रेणीतील तिसरी कार आहे.
-
लाँचिंगनंतर काही दिवसातच तिची विक्री सुरु झाली. एमजी ग्लॉस्टर ही सध्या २९.९८ लाख रुपये किंमतीत उपलब्ध आहे.
-
ग्राहक प्रीमियम एसयूव्हीला १००,००० रुपये या किंमतीत बुक करू शकतात.
-
एमजी ग्लॉस्टरमध्ये या सेगमेंटमधील प्रथमच अशी अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम समाविष्ट आहे. यातील काही मूलभूत वैशिष्ट्यांमध्ये अडाप्टिव्ह क्रूस कंट्रोल, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, आणि ऑटोमॅटिक पार्किंग असिस्ट यांचा समावेश आहे.
-
तसेच फॉरवर्ड कोलायजन वॉर्मिंग, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन या सुविधांचाही समावेश आहे.
-
ग्लॉस्टर ऑन डिमांड फोर-व्हील ड्राइव्ह सुविधेसह येते, ज्याद्वारे विविध ड्रायव्हिंग मोड्स मिळतात.
-
यामध्ये इंटेलिजंट ऑल टेरेन सिस्टिम असून त्यात ऑफ रोडिंगदरम्यान अधिक कंट्रोलची सुविधा मिळते.
-
यात समर्पित असे रिअर डिफरन्शिअल आणि बोर्जवॉर्नर ट्रान्सफर केस असून अत्याधुनिक शिफ्ट-ऑन-द-फ्लाय तंत्रज्ञानही आहे.
-
तसंच स्नो, मड, सँड, इको, स्पोर्ट, नॉर्मल आणि रॉक असे सात विविध प्रकारचे ड्रायव्हिंग मोड्स येतात.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं