प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. केवळ देशातच नाही तर विदेशातही मुकेश अंबानी हे नाव लोकप्रिय आहे. ( सौजन्य : जनसत्ता) जगातल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचं नाव घेतलं जातं. त्यामुळे त्यांच्या राहणीमानाविषयी आणि त्यांच्या लाइफस्टाइलविषयी कायमच प्रत्येकाला उत्सुकता असते. मुकेश अंबानी यांच्या उद्योग-व्यवसायासोबतच त्यांचं मुंबईतील एंटीलिया हे घरदेखील अनेकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. एंटीलिया ही २७ मजल्याची भव्य इमारत आहे. मुकेश अंबानींच्या या घरामध्ये हेल्थ स्पा, सलून, बॉलरुम, स्नो रूम, खासगी चित्रपटगृह, ३ स्विमिंग पूलसह अनेक सुविधा आहेत. या भव्य इमारतीत १६८ गाड्या पार्क केल्या जाऊ शकतील एवढी जागा असून या घराच्या छतावर हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी तीन हेलिपॅड्स देखील आहेत. मुकेश अंबानी यांचं एंटीलिया हे घर जगातील दुसऱ्या क्रमांकाचं महागडं घर आहे. त्यामुळे या घराविषयी जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. यामध्येच एवढ्या मोठ्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट नेमकी कशी लावली जाते? हा प्रश्न अनेकांना असेल. अंबानी यांच्या घरात जवळपास ६०० जण काम करतात. अंबानी यांच्या घरातील कचरा अन्य इतर कोणत्याही ठिकाणी टाकला जात नसून त्याची एंटीलियामध्येच त्याची विल्हेवाट लावली जाते. विशेष म्हणजे एंटीलियामध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जाते. हीच वीज अंबानी यांच्या घरासाठी वापरली जाते. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एंटीलियामध्ये एक मिनी प्लाण्ट उभारण्यात आला आहे. खरं तर या वृत्ताला अंबानी कुटुंबाकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र, असा वीज निर्मितीचा प्लाण्ट असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना इशा, आकाश आणि अनंत ही तीन मुलं आहेत. इशाने पिरामल इंडस्ट्रीजच्या आनंद पिरामल यांच्याशी लग्न केलं. -
मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा खास फोटो
७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?