-
बॉलिवूडच्या काही दिग्गज अभिनेत्री आज अभिनयासोबत व्यवसाय क्षेत्रातही आहेत. काही अभिनेत्रींनी स्टार्टअपमध्येही गुंतवणूक केली आहे. जाणून घेऊया कोण आहेत या अभिनेत्री.
-
बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री दीपिका पादुकोणनं Bellatrix एअरोस्पेसमध्ये गुंतवणूक केली आहे. हे स्टार्टअप इस्रोसोबत २०१६ पासून त्यांच्या सॅटेलाईट अभियानासाठी तंत्रज्ञान पुरवत आहे.
-
अभिनेत्री आलिया भट्ट हिनंदेखील Nykaa या कंपनीत व्यक्तीगत गुंतवणूक केली आहे. सेकंडरी ट्रान्झॅक्शनद्वारे तिनं ही गुंतवणूक केली आहे. तिनं किती रक्कम या गुंतवली आहे याची मात्र माहिती देण्यात आली नाही. Nykaa ची स्थापना २०१२ मध्ये फाल्गुनी नायरनं केली होती.
-
अभिनेत्री काजल अग्रवालनं मुंबई स्थित ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म Okie Gaming मध्ये गुंतवणूक केली आहे. तिनं कंपनीतील १५ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. तसंच तिनं कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्य म्हणून कार्यभार स्वीकारला होता.
-
कतरिना कैफनंदेखील Nykaa मध्ये गुंतवणूक केली आहे. सेकंडरी ट्रान्झॅक्शनद्वारे तिनं ही गुंतवणूक केली आहे. यापूर्वी तिनं Nykaa सोबत भागीदारीत आपल्या ब्यूटी ब्रँडची स्थापना केली होती.
-
ऐश्वर्या राय बच्चननं आपली आई वृंदा यांच्यासोबत बंगळुरूतील पर्यावरणाशी निगडीत एका स्टार्टअपमघ्ये १ तोटींची गुंतवणूक केली आहे. ही कंपनी हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी डेटाचा वापर करते.
-
२०१८ मध्ये प्रियाका चोप्रानं टिंडरचं स्पर्धक अॅप Bumble मध्ये भागीदारी केल्याची घोषणा केली होती. ती या स्टार्टअपसोबत भागीदार, सल्लागार आणि गुंतवणूकदार म्हणून जोडली गेली होती.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं