-
व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक खूशखबर आहे. कंपनीने नेहमीप्रमाणे अॅप अपग्रेड केलं असून यामध्ये नव्या ६१ वॉलपेपर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे युजर्सना चॅटिंग करताना वेगळाच अनुभव मिळू शकतो.
-
व्हॉट्सअॅपनं सध्या आपल्या बीटा युजर्ससाठी हे वॉलपेपर आणलं आहे.
-
व्हॉट्सअॅप बीटा इन्फोने याबाबत माहिती देताना म्हटलं की, “व्हॉट्सअॅपने आपल्या अँड्रॉईड बीटा युजर्ससाठी अॅडव्हान्स्ड वॉलपेपर नावाचं फीचर लॉन्च केलं आहे.
-
युजर्स आपल्याला आवडेल अशा पद्धतीनं चॅटिंगच्या बॅकग्राउंडचं वॉलपेपर बदलू शकतात. आता यासाठी त्यांना ६१ नव्या वॉलपेपर्सचे पर्याय मिळू शकतील.
-
ट्वीटसोबत व्हॉट्सअॅप बीटा इन्फोने वॉलपेपर्सच्या डिझाईनची यादी देखील प्रसिद्ध केली आहे. याद्वारे नवे वॉलपेपर कसे दिसतात हे पाहता येईल.
-
यातील खास बाब ही आहे की युजर्स वॉलपेपरच्या ओपेसीटीमध्ये देखील बदल करु शकतात.
-
युजर्स ३२ नवे ब्राइट वॉलपेपर्स, २९ नवे डार्क वॉलपेपर्स, कस्टम वॉलपेपर आणि सॉलिड कलरमध्ये आपल्या हिशोबानं निवडू शकतात.
-
जर आपण जुना वॉल पेपर निवडला तर आपण व्हॉट्सअॅप अर्काईव्ह हा पर्याय निवडू शकता.
-
जर आपण सॉलिड रंगांना नव्या वॉलपेपरप्रमाणे सेट करु इच्छित असाल तर आपण याला व्हॉट्सअॅप डुडलवर घेऊ शकता.
-
व्हॉट्सअॅप बीटा इन्फोने सांगितलंय की, सध्या याला बीटा युजर्ससाठी लॉन्च करण्यात आलं आहे. लवकरच याला स्टेबल व्हर्जनमध्ये सर्वांसाठी लॉन्च करण्यात येणार आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”