इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp आज जगात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप आहे. हे तर जगजाहीर आहे की ज्या गोष्टी लोकप्रिय असतात, त्यावर अनेकांची वक्रदृष्टी असतेच. व्हॉट्सअॅपही आता हॅकर्सच्या निशाण्यावर आहे. -
WhatsApp बाबत दररोज नवनवीन फ्रॉड समोर येत आहेत. आता WhatsApp OTP स्कॅम या एका नवीन स्कॅमला व्हॉट्सअॅपवर सुरूवात झाली असून याद्वारे तुमचे मित्रच तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करु शकतात. सविस्तर जाणून घेऊया नेमका काय आहे WhatsApp OTP स्कॅम आणि कसा करायचा त्यापासून बचाव?
-
स्कॅमर किंवा हॅकर सर्वप्रथम तुम्हाला एखाद्या मित्राच्या नावाने मेसेज पाठवतात. त्यामध्ये तुमचा मित्र अडचणीत असल्याचा दावा केला जातो. अनेकदा हॅकर्स तुमच्या मित्रांच्याच नंबरवरुन मेसेज पाठवतात. एसएमएस किंवा फेसबुक मेसेंजरद्वारे संपर्क साधण्याचा प्रय़त्न होऊ शकतो.
-
यानंतर तुम्ही त्या नंबरवर रिप्लाय दिल्यास हॅकरकडून OTP ची विचारणा केली जाते. चुकून एक मेसेज तुमच्या नंबरवर पाठवला आहे, कृपया तो मेसेज फॉरवर्ड करा अशाप्रकारची काही खोटी कारणं सांगून हॅकरकडून OTP मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.
-
तुम्ही ओटीपी फॉरवर्ड करताच, तुमच्या नंबरवरुन हॅकरच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरू होतं. व्हॉट्सअॅपला एखाद्या नवीन डिव्हाइसमध्ये इंस्टॉल करण्यासाठी ओटीपीची गरज असते, आणि तोच ओटीपी हॅकर तुमच्याकडून मिळवतो.
-
त्यानंतर तुमच्या व्हॉट्सअॅप अकाउंटचा सर्व अॅक्सेस हॅकरला मिळतो. आता हॅकर तुमच्या नंबरवरुन मित्रांना किंवा कुटुंबियांना मेसेज पाठवून त्यांच्याकडून पैशांची मागणी किंवा ब्लॅकमेल करणे, यांसारखे फ्रॉड करतो.
-
अशाप्रकारच्या स्कॅमपासून बचावासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणासोबतही ओटीपी शेअर करु नका. ज्या मित्राकडून किंवा नातलगाकडून मेसेज आला असाल त्यांना थेट कॉल करा.
-
याशिवाय व्हॉट्सअॅपमध्ये टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचा पर्याय ऑन करा. हा पर्याय ऑन केल्यामुळे ओटीपीशिवाय अजून एक कोडची आवश्यकता लागते आणि तो कोड फक्त तुमच्याकडेच असतो.
-
जर तुम्ही या हॅकर्सच्या जाळ्यात अडकला असाल तर तातडीने तुम्हाला तुमचं व्हॉट्सअॅप रिसेट करुन पुन्हा लॉगइन करावं.
-
व्हॉट्सअॅपवर तुमची खासगी चॅटिंग, फोटो-व्हिडिओ किंवा महत्त्वाची कागदपत्रे असतात. त्यामुळे हॅकर्सना तुमच्या अकाउंटचा अॅक्सेस मिळणं धोकादायक ठरू शकतं. व्हॉट्सअॅप वापरताना खबरदारी न घेणारे युजर्स हॅकर्सचे सहज लक्ष्य ठरतात. त्यासाठी युजर्सनी व्हॉट्सअॅप वापरताना सतर्क राहणं गरजेचं आहे.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं