-
Renault Kiger कॉन्सेप्टचे काही फोटो आता समोर आले आहेत. पुढील वर्षी ही कार लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Renault Kiger या कारचं प्रोडक्शन मॉडेल हे ८० टक्के कॉन्सेप्ट मॉडेलप्रमाणेच असणार असल्याचं रेनो इंडियाकडून सांगण्यात आलं आहे. Renault Kiger ही कंपनीची B-SUV असणार आहे. (सर्व फोटो – रेनो)
-
Renault Kiger चा बोल्ड आणि स्टायलिस्ट लूक सर्वांच्याच पसंतीस उतरणार आहे. गाडीच्या पुढील बाजुला रेनो SUV चे सिग्नेचर ग्रील देण्यात आलं आहे. तसंच ते आयब्रोप्रमाणे LED DRLs च्या सोबत इंटिग्रेट आहे.
-
Kiger चा ग्राऊंड क्लिअरंस २०० एमएम असण्याची शक्यता आहे. तसंच रिअर टेल लॅम्पला C शेप लूक देण्यात आला आहे.
-
Kiger कॉन्सेप्टमध्ये १९ इंचाचे अलॉय व्हिल्स आणि सेंट्रली माऊंटेड रेअर एक्झॉस्ट देण्यात आले आहेत. Kiger मध्ये फ्लोटिंग रूफ डिझाईन असणार आहे. म्हणजेच त्यात Kiger मध्ये ड्युअल टोन कलर स्कीम असण्याचीही शक्यता आहे.
-
Kiger मध्ये अनेक चांगले फिचर्स देण्यात येणार असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे. ८ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्राइवर इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग, वायरलेस अॅप्पल कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटो, इंटरनेट अनेबल्ड फीचर्सही कारसोबत मिळण्याची शक्यता आहे. आतून ही कर कशी दिसेल याबाबत मात्र माहिती समोर आलेली नाही.
-
Kiger चं ग्लोबल लाँच भारतातच होणार आहे. त्यानंतर अन्य देशांमधील बाजारात ती कार विक्रीसाठी उपलब्ध होईल. क्विड आणि ट्रायबरनंतर ही तिसरी ग्लोबल कार असेल जी Groupe Renault पहिले भारतात लाँच करणार आहे.
Vaibhav Suryavanshi: १४ वर्षीय वैभवने रचला इतिहास! ३५ चेंडूत झळकावलं वादळी शतक