साधारपणे हिवाळा ऋतु सुरु झाला की सर्दी, पडसे, खोकला अशी करकोळ दुखणी डोकं वर काढू लागतात. त्यामुळे या लहान-लहान समस्यांपासून सुटका करुन घ्यायची असेल तर आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याची आवश्यकता आहे. सर्दी-खोकला दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. हे उपाय कोणते ते जाणून घेऊयात. लाल सिमला मिरची – लाल सिमला मिरचीमध्ये असलेल्या व्हिटामिनमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. लाल सिमला मिरचीमुळे रोगप्रतिकारकशक्ती दुपट्टीने वाढली जाते असं म्हटलं जातं. बडीशोप – साधारणपणे जेवण झाल्यावर आपण मुखवास म्हणून बडीशोप खातो. मात्र, बडीशोप खाण्याचे अनेक फायदे आहेत. बडीशोपमुळे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर टाकले जातात. तसंच पांढऱ्या रक्तपेशींची संख्या वाढते. हळद – हळदीमुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. शरीरावरील जखम लवकर भरते. लसूण – पदार्थाची चव वाढवणाऱ्या लसूणमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम मोठ्या प्रमाणावर आहे. रताळं – साधारणपणे उपवासाच्या दिवशी खाल्लं जाणारं रताळं हे अत्यंत फायदेशीर आहे. रताळ्यात मोठ्या प्रमाणावर अँटी ऑक्सिडेंट्स असतात. ग्रीन टी – अनेक जण वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पितात. मात्र, ग्रीन टीमुळे वजन कमी होण्यासोबतच प्रचनक्रिया सुधारते. शरीरातील अतिरिक्त मेद कमी होण्यास मदत मिळते. योगर्ट – योगर्टमुळे पचनशक्ती सुधारते. तसंच कोणत्याही अन्नपदार्थाचं सेवन लगेच होतं.
७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?