-
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी आपल्या थेट राजकीय भूमिकांमुळे कायम चर्चेत असतात.
-
संसदेत हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधीत्व करतात. हैदराबादमध्येच त्यांचं खासगी घर असून इथे ते आपल्या कुटुंबियांसोबत राहतात.
-
असदुद्दीन ओवेसी यांचा आलिशान बंगला हैदराबादच्या शास्त्रीपुरम कॉलनीमध्ये आहे.
-
ओवेसींच्या घराच्या बैठकीच्या खोलीत सुंदर झुंबरं, गालिचा आणि सोफे ठेवण्यात आले आहेत.
-
ओवेसी यांनी आपल्या घरात मोठी लायब्ररी देखील उभारली आहे.
-
असदुद्दीन ओवेसी यांचे धाकटे बंधू अकबरुद्दीन ओवेसी हे देखील राजकारणात सक्रिय आहेत. तर सर्वात छोटे बंधू बुरहानुद्दीन ओवेसी हे 'इत्तेमाद' या वृत्तपत्राचे संपादक आहेत.
-
त्यांनी आपलं घर शाही थाटात सजवलं आहे. घरात त्यांनी आपल्या पूर्वजांच्या तस्बीरी देखील लावल्या आहेत.
-
त्यांच्या घरासमोरच मोठा लॉन आहे. घराच्या या लॉनमध्येच ओवेसी जनता दरबारही भरवतात.
-
असदुद्दीन ओवेसी यांना सहा मूलं आहेत. यांमध्ये ५ मुली तर एक मुलगा आहे.
-
आलिशान झुंबरं, आकर्षक सजावटींनी सजलाय ओवेसींचा बंगला. ( सर्व फोटो : सोशल मीडिया )
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच