निसानने (Nissan ) आपली Nissan Magnite ही नवीन सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही बुधवारी भारतात लाँच केली. यासोबतच ही भारताच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीतील सर्वात स्वस्त एसयूव्ही ठरली आहे. ऑक्टोबरमध्ये कंपनीने ही सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही सादर केली होती, अखेर आजपासून ही गाडी भारतीय बाजारात उपलब्ध झाली आहे. -
कंपनीने निसान एसयूव्हीसाठी इंजिनचे दोन पर्याय दिलेत. यात एक नॅचरली एस्पिरिटेड पेट्रोल इंजिन आणि एक टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनचा समावेश आहे.
-
यातील पहिलं B4D नॅचुरली एस्पिरेटेड 1.0 लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 72 hp पॉवर आणि 96 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. या इंजिनद्वारे, 18.75 kpl इतका माइलेज मिळेल असा कंपनीचा दावा आहे.
-
तर, दुसरं इंजिन 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 100 hp पॉवर जनरेट करतं. 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनसह हे इंजिन 160 Nm टॉर्क आणि 20 kpl मायलेज देईल. तर, CVT गिअरबॉक्ससोबत 152 Nm टॉर्क आणि 17.7 kpl मायलेज मिळतो.
-
Magnite च्या बूकिंगलाही आजपासून सुरूवात झाली असून कंपनीच्या वेबसाइटवरुन अवघ्या 11 हजार रुपयांच्या टोकन अमाउंटवर बूकिंग करता येईल.
-
Nissan Magnite च्या केबिनच्या प्रीमियम फीचर्समध्ये Android Auto व Apple CarPlay ला सपोर्ट करणारी 8 इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, सेगमेंट फर्स्ट 360 डिग्री अराउंड व्यू मॉनिटर, इन बिल्ट टायर प्रेशर मॉनिटर, 7 इंच टीएफटी इंस्टूमेंट क्लस्टर अशा फिचर्सचा समावेश आहे. याशिवाय व्हॉइस रिकग्निशन, ऑटोमॅटिक एसी, क्रूज कंट्रोल, हाइट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट हे फिचर्सही आहेत.
-
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या एसयूव्हीमध्ये EBD सोबत ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, ड्युअल एअरबॅग्स, व्हेइकल डायनॅमिक्स कंट्रोल असे दर्जेदार फिचर्स आहेत.
-
या एसयूव्हीच्या निवडक व्हेरिअंटमध्ये कंपनी ‘टेक पॅक’ देखील देईल. यात वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग पॅड, एअर प्युरिफायर, जेबीएल स्पीकर्स, एंबियंट मूड लायटिंग फिचर्सचा समावेश आहे.
-
Nissan Magnite च्या पुढील बाजूला लार्ज सिंगल पीस ग्रिल, L शेपमध्ये LED DRLs, एलईडी लाइट गाइड, LED Bi-प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, LED फॉग लॅम्प्स आहे. याशिवाय faux स्किड प्लेट्स, स्प्लिट रॅपअराउंड LED टेल लॅम्प्स आणि ड्युअल टोन अॅलॉय व्हील्स आहे.
-
किंमत : निसानने आपल्या या नवीन एसयूव्हीच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 5.54 लाख रुपये (एक्स-शोरुम) ठेवली आहे. पण 31 डिसेंबरपर्यंत बूकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी या गाडीची किंमत 4.99 लाख रुपये असेल. Nissan Magnite ची विक्री भारतातून सुरू होत असून ग्लोबल मार्केटमध्ये ही गाडी काही कालावधीनंतर उपलब्ध केली जाणार आहे. भारतात या एसयूव्हीची टक्कर ह्युंडाई व्हेन्यू, महिंद्रा XUV 300, फोर्ड इकोस्पोर्ट, टोयोटा अर्बन क्रुजर, होंडा WR-V, किया सोनेट आणि मारुती सुझुकी व्हिटारा ब्रेझा अशा लोकप्रिय गाड्यांसोबत असेल. ( सर्व फोटो : https://www.nissan.in/ )

गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’