-
सध्या इलेक्ट्रिक बाईक्सची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. येणाऱ्या काळात पेट्रोलच्या बाईक्सप्रमाणे इलेक्ट्रिक बाईक्सही मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर दिसतील अशी अपेक्षा केली जात आहे. काही कंपन्यांनी आपल्या बाईक्सची इलेक्ट्रिक मॉडेल्सही आणण्यास सुरूवात केली आहे. यापूर्वी रॉयल एनफिल्डनंही आपण इलेक्ट्रिक बाईक्स बाजारात आणणार असल्याचं म्हटलं होतं. कंपनीनं जरी इलेक्ट्रिक बाईक लाँच केली नसली तरी बुलेटच्या कस्ट बिल्ट इलेक्ट्रिक व्हर्जन उपलब्ध आहेत.
-
Hammarhead Volta – जेम्ल हेमरहेडनं १० वर्षांपू्वी रॉयल एनफिल्ड बुलेटवर आधारित इलेक्ट्रिक बाईक तयार केली होती. Volta मध्ये BLDC 3—फेज परमनंट मॅग्नेट ब्रशलेस मोटर आहे. ती १३.४ एचपी पावर आणि ४० एचपीचा पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकचा सर्वाधिक वेग ताशी १२० किलोमीटर आहे आणि एकदा चार्ज केल्यानंतर ही बाईक ८० किमीपर्यंत जाते. (Photo: Peter Henshaw)
-
The Charging Bullet: फ्रेड स्पॅवेननं ही कस्टम बाईक तयार केली होती. यामध्ये बुलेटच्या डोनर फ्रेमचा वापर करण्यात आला होता. तसंच यामध्ये नवं बॅटरी पॅक आणि ड्राईव्हट्रेनचा वापर करण्यात आला होता. एका वेळी पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बाईक ६४ ते ८० किलोमीटरचा पल्ला गाठू शकते. (Photo: Rushlane)
-
Royal Enfield Photon: इलेक्ट्रिक क्लासिक कार्सनं ही बाईक कस्टमाईज्ड केली होती. ही बाईक एकदा चार्ज केल्यानंतर जवळपास १२८ किलोमीटरचा पल्ला गाठू शकते. या बाईकचा सर्वाधिक वेग ११२ किलोमीटर प्रतितास आहे. (Photo: Peter Henshaw)
-
डिसेंबर २०१७ मध्ये इंटरनेटवर ऑल इलेक्ट्रिक बुलेटचा फोटो व्हायरल झाले होते. ते फोटो बँकॉकमध्ये घेतल्याचा दावा करण्यात आला होता. ही बाईक कोणी मॉडिफाय केली याची माहिती नव्हती. परंतु ती बँकॉकमधीलच एका कस्टम हाऊसनं तयार केल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु या बुलेटनं सर्वांनाच आकर्षित केलं होतं.

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…