-
शुद्ध देसी रोमान्स या हिंदी चित्रपटातील चुलबुली अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचा फॅशन सेन्स तगडा आहे. कायमच ती आपल्याला विविध ट्रेंडी कपड्यांमध्ये दिसत असते. नुकतेच तीनं आपल्या इन्स्टाग्रामवर हिवाळ्यातील काही ट्रेंडी कपड्यांवरील फोटो पोस्ट केले आहेत. (Photo source : parineetichopra@insta)
-
थंडीच्या दिवसांत स्वेटर्स, कोट्स आणि हँडग्लोव्हज हे हातात हात घालून येतातच. कडाकाच्या थंडीत तर तुम्हाला ग्लोव्ह्ज घालणं गरजेचंच. परिणीतीचाही यावर विश्वास असून जर्मनीतील म्युनिच शहरात असताना थंडीमध्ये तीने लाँग कोट आणि हातात ग्लोव्ह्ज परिधान केलेला फोटो शेअर केला आहे. तिथं सुरु असलेल्या ख्रिसमसच्या तयारीच्या आणि बर्फ पडतानाच्या पार्श्वभूमीवर तीने फोटो शूट केले आहेत.
-
थंडीच्या दिवसांमध्ये कोनटोपी, स्वेटर्स, कोट, ग्लोव्ह्ज यांच्याबरोबरच पायांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी बूट्सही महत्वाचे ठरतात. परिणीतीने म्युनिचमधील अवघ्या तीन डिग्री सेल्सिअस तापमानात आणि पडत असलेल्या पावसात हे बूट किती महत्वाचे आहेत हे देखील सांगितलं आहे. तीन डिग्रीच्या तापमानात रस्त्यांवरुन चालताना आजूबाजूला ख्रिसमसची तयारी सुरु असल्याने ही तयारी ऊब देणारी असल्याचंही तिने म्हटलं आहे. तसेच इथे पाऊसही पडत असल्याने पायात गमबुट तर आलेच.
-
ओव्हर कोट हा थंडीच्या दिवसांत तुम्हाला थंडीपासून संरक्षण तर देतोच पण तुमच्या व्यक्तीमत्वातही भर घालतो. इंग्लंडमधील यॉर्क येथे टिपलेल्या या छायाचित्रात ती ओव्हर कोट परिधान करुन मस्त उनं अंगावर घेताना दिसते आहे. करोनाचा धोका इथेही असल्याने तोंडावर मास्कही आहेच.
-
हेंगेरीतल्या बुडापेस्ट येथे टिपलेल्या या छायाचित्रात डोक्यावर थंडीची वुलन टोपी, अंगात स्वेटर, हातात ग्लोव्ह्ज, पायात बुट, स्टड्स घातले आहेत. त्याचबरोबर तिच्या डोळ्यावर गॉगल आणि खांद्यावर पर्सही आहे. विशेष म्हणजे या सर्व वस्तू एकाच रंगात आहेत आणि तो रंग म्हणजे थंडीपासून उब देणारा काळा रंग.
-
या एका फोटोत तीने थंडीच्या दिवसांत सफेद रंगाची रंगसंगती असलेले कपडे परिधान केले आहेत. यामध्ये डोक्यावर टोपी, अंगात स्वेटर, ट्राऊझर परिधान केली आहे. विशेष म्हणजे या फोटोला कॅप्शन देताना तिनं 'व्हाईट ख्रिसमस' असं संबोधलं आहे.

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…