-
वायफाय तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान आता सगळ्यांनाच परिचयाचे झाले आहे. घरातील सगळ्यांनीच डेटा पॅकचा रिचार्ज न करता इंटरनेटचा वापर करता यावा यासाठी घरातील इंटरनेट जोडणीला वायफाय राऊटर लावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
-
पण या वायफाय नेटवर्कची सुरक्षाही तितकीच गरजेची आहे.
-
फक्त एकच व्यक्ती नाही तर अनेक जण याने जोडलेले असतात म्हणूनच तुमचे वाय फाय नेटवर्क सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टी जरूर करा.
-
नवीन तंत्रज्ञानावर आधारित सर्वच राऊटर आपल्याला उच्च दर्जाची सुरक्षा पुरवितात. यामध्ये आपण खरेदी करत असलेले राऊटर ‘डब्लूपीए २’ आधारित आहे हे तपासून घेणे गरजेचे आहे.
-
राऊटर सेटिंगवर जाऊन डिफॉल्ट यूजर नेम आणि पासवर्ड पहिल्यांदा बदलून घ्या. वाय फाय सर्व्हिस मॅन्यूएलमधून याबाबतीत तुम्हाला मार्गदर्शन केले असते ते पाहून या सेटिंगमध्ये तुम्ही बदल करू शकता.
-
शेजारी किंवा मित्र मैत्रिणींना वायफायचा एक्सेस देऊ नका. जास्तीत जास्त युजर्स वायफाय वापरत असले की वेग कमी होतो. पण याचबरोबर तुमचा कम्प्युटर हॅक होण्याची शक्यता असते.
-
शक्य असल्या व्हायरलेस सिग्लनची रेंज ही हाय असेल तर ती कमी ठेवा म्हणजे हि सिग्लन यंत्रणा फक्त तुमच्या घरापुरता मर्यादित ठेवा.
-
व्हायरलेस नेटवर्क नेम म्हणजे एसएसआयडी चे नाव बदला. हे नाव ठेवताना तुमचे नाव, घराचा किंवा बिल्डिंगचा पत्ता आणि वाढदिवसांची तारिख वगैरे एसएसआयडी ठेवणे टाळा.
-
काहींच्या घरी चोवीस तास वायफाय सुरु असते. पण शक्य असेल तर वाय फाय बंद ठेवा.
-
वायफायच्या सिक्युरिटीसाठी व्हर्चुअल प्राइवेट नेटवर्कचा वापर करा. या सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही तुमचे वायफाय नेटवर्क सुरक्षित ठेवू शकता.

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…