मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची लाडकी लेक म्हणजे इशा अंबानी. (सौजन्य : जनसत्ता) २०१८ साली इशाने प्रसिद्ध उद्योगपती आनंद पिरामल यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. अंबानींप्रमाणेच पिरामल हे नावदेखील उद्योगक्षेत्रातील मोठं प्रतिष्ठेचं नाव असून इशा व आनंद या दोघांमुळे ही दोन्ही कुटुंब एक झाले. इशाच्या माहेरप्रमाणेच तिचं सासरदेखील गडगंज श्रीमंत असून त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि राहणीमानाची चर्चा होत असते. इशा आणि आनंद वरळीत राहत असून ओल्ड गुलीटा असं त्यांच्या बंगल्याचं नाव असल्याचं म्हटलं जातं. इशा- आनंदचा हा बंगला तब्बल ४५२ कोटी रुपयांचा आहे. अजय पिरामल यांनी आपल्या सुनेला म्हणजेच इशाला हा बंगला खास भेट म्हणून दिल्याचं सांगण्यात येतं. वरळीमधील ५० हजार स्क्वेअर फीट जागेवर ओल्ड गुलीटा हा बंगला उभा आहे. बंगल्यातून सुंदर समुद्र किनाऱ्याचं दर्शन होणार आहे. तसंच इतरही काही विशेष सुविधा उपलब्ध आहेत. इशा आणि आनंद यांचं लग्न अंबानी कुटुंबीयांच्या ‘अँटीलिया’ बंगल्यात अगदी थाटामाटात हे पार पडलं. या सोहळ्यासाठी बॉलिवूडपासून राजकारण आणि क्रीडाविश्वापासून ते उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली. आनंद आणि इशा जुने मित्र आहेत. आनंदने महाबळेश्वरच्या मंदिरात इशासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. दोन्ही कुटुंबियांचे सुमारे ४० वर्षांपासून चांगले संबंध आहेत. -
इशाचा लग्नातील एक सुंदर फोटो.
-
इशा अंबानी- पिरामल
“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक