-
करोनाच्या संसर्गापासून बचावासाठी संशोधनातून एक स्मार्ट अंगठी विकसीत करण्यात आली आहे. ही अंगठी बोटात घातल्यानंतर करोनाच्या संसर्गाची प्राथमिक माहिती कळू शकते, असा दावा करण्यात आला आहे. (सर्व छायाचित्रे – संग्रहित)
-
ही स्मार्ट अंगठी सातत्याने तुमच्या शरिराच्या तापमानाची नोंद ठेवत असते. त्यामुळे या स्थितीतच जेव्हा करोनाच्या संसर्गाची लक्षणेही नसतात, त्यावेळी या जीवघेण्या संसर्गाची माहिती कळू शकते.
-
साइंटिफिक रिपोर्ट्स पत्रिकामध्ये सोमवारी याबाबत एक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाला आहे. थर्मामीटरच्या तुलनेत ही स्मार्ट अंगठी आजाराचे संकेत देण्यात जास्त प्रभावशाली आहे.
-
यामुळे सुरुवातीलाच आयसोलेशनमध्ये राहणे आणि तपासणी करुन घेणे सोपे होऊ शकते. यामुळे करोनासारख्या आजाराचे संक्रमण रोखण्यास मदत होऊ शकते.
-
अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील वैज्ञानिकांनी सांगितलं की, ज्यांना यापूर्वी करोना झाला होता अशा ५० लोकांवर केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
-
या संशोधनात स्मार्ट अंगठीच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले आणि करोनाची लक्षणं असलेल्या लोकांमध्ये उच्च तापमानाची ओळख करण्यात हे डिव्हाईस तंतोतंत योग्य ठरले.
-
अशा पद्धतीने ५० पैकी ३८ सहभागींच्या अंगामध्ये त्यावेळी ताप असल्याचे समोर आले होते. पण त्यांच्यामध्ये करोनाची लक्षणं दिसून आली नव्हती.
-
वैज्ञानिकांनी म्हटलं की, शरीरात किरकोळ स्वरुपातही लक्षणं दिसून आल्यानंतर ही स्मार्ट अंगठी कोणता आजार आहे हे ओळखू शकते.
-
कॅलिफोर्निया विद्यापीठाचे संशोधक अॅश्ले मेसन यांनी म्हटलंय की, शरीराच्या तापमानावर अनेक बाबींचा परिणाम होतो.
-
शरिराच्या तापमानावर सातत्याने लक्ष ठेवणे ताप ओळखण्याचा सर्वात चांगला प्रकार आहे.
Zapuk Zupuk: सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख