-
काही दिवसांपूर्वी WhatsApp नं काही जुन्या मोबाईल फोनवर यापुढे आपलं अॅप चालणार नसल्याची घोषणा केली होती.
-
दरम्यान, आता WhatsApp नं पुढील वर्षाच्या सुरूवातीपासून म्हणजेच १ जानेवारीपासून काही स्मार्टफोन्ससाठी सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
यामध्ये अँड्रॉईडसह काही आयफोन्सचाही समावेश आहे.
-
ज्या अँड्रॉईडमध्ये आणि आयफोनमध्ये WhatsApp नं सांगितलेल्या पेक्षा जुनं ऑपरेटिंग सिस्टम असेल त्यात हे अॅप चालणार नाही.
-
माध्यमांमध्ये आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार आयओएस ९ आणि अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम ४.०.३ पेक्षा जुन्या व्हर्जन्सवर WhatsApp काम करणार नाही.
-
आयफोन ४ आणि त्यापूर्वीच्या आयफोनवरही WhatsApp चा सपोर्ट बंद केला जाऊ शकतो. त्यानंतरच्या काही आयफोन्समध्ये जुनं सॉफ्टवेअर असेल तर ते अपडेट करता येऊ शकतं.
-
नवं सॉफ्टवेअर अपडेट झाल्यानंतर या मॉडेलमध्ये WhatsApp चालवलं जाऊ शकतं.
-
अँड्रॉईड फोनबद्दल सांगायचं झाल्यास ज्या फोनमध्ये ४.०.३ पेक्षा जुनं अँड्रॉईड व्हर्जन असेल त्यात १ जानेवारीनंतर WhatsApp चालणार नाही.
-
सध्या WhatsApp सातत्यानं नवे अपडेट्स आणि सिक्युरिटी पॅच देत आहे. अशा परिस्थितीत जुन्या व्हर्जनमध्ये सॉफ्टवेअर सपोर्ट देणं कंपनीला अशक्य असतं.
-
जर तुमच्याकडेही जुनं सॉफ्टवेअर असलेला फोन असेल तर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नवी अपडेट आली आहे का हे पाहू शकता.

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…