-
मारुती सुझुकी या कार कंपनीची देशाच्या वाहन क्षेत्रातील प्रमुख आणि विश्वासार्ह कंपन्यांमध्ये गणना होते.
-
पण, आता मारुतीच्या जुन्या गाड्यांना रंगरंगोटी करुन नवीन कार म्हणून ग्राहकांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
विशेष म्हणजे मारुती सुझुकीच्या एका अधिकृत डिलरकडूनच अशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक सुरू होती.
-
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता त्या डिलरचं लायसन्स रद्द करण्यात आलं आहे.
-
आसाममध्ये मारुती सुझुकीच्या एका डिलरचं लायसन्स रद्द करण्यात आलं आहे. आसामच्या परिवहन विभागाने या डिलरचं ट्रेड लायसन्स रद्द केलं.
-
हा डिलर कंपनीच्या जुन्या गाड्यांना रंगरंगोटी करुन शोरुममधूनच विकून ग्राहकांची फसवणूक करत होता.
-
एका व्यक्तीने या डिलरविरोधात फसवणुकीबाबतची तक्रार परिवहन आयुक्त कार्यालय आणि जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
-
"एका ग्राहकाकडून तक्रार आल्यानंतर गुवाहाटी येथील पोद्दार कार वर्ल्डच्या शोरूममध्ये छापा मारण्यात आला. छाप्यामध्ये जुन्या गाड्या विकून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे पुरावे सापडले", अशी माहिती जिल्हा परिवहन अधिकारी गौतम दास यांनी दिली.
-
छापा पडल्यावर शोरुमच्या अधिकाऱ्यांनी अनावधानाने जुन्या गाडीची विक्री झाल्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं कारण न पटल्याने आसामच्या परिवहन विभागाने संबंधित डिलरचं ट्रेड लायसन्स रद्द केलं.
-
लोकं विश्वास ठेवून शोरुममधून कार खरेदी करतात, पण मारुती सारख्या प्रतिष्ठित कंपनीच्या अधिकृत शोरुममधून जुन्या गाड्यांना रंगरंगोटी करुन नवीन गाडी म्हणून विकल्याचा प्रकार समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (सर्व प्रातिनिधिक छायाचित्र )

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…