-
दिग्गज कंपन्यांच्या प्रत्येक प्रोडक्टवर जगाच्या नजरा खिळून बसलेल्या असतात. अशा कंपन्यांचे प्रोडक्ट येताच ते प्रोडक्ट्स सोशल मीडियावर ट्रेंड होत असतात किंवा ट्रेंड सेटर बनतात.
-
पण, अनेकदा फॅशनबाबत केलेले नवनवे प्रयोग त्यांच्याच अंगलट येतात. असंच काहीसं घडलंय इटलीचा प्रख्यात फॅशन ब्रँड लेबल गुच्ची (Gucci) सोबत.
-
गुच्चीने एक नवीन चष्मा लाँच केलाय. पण या चष्म्याचं डिझाइन उलटं असल्याने हा चष्मा सध्या नेटकऱ्यांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.
-
डिझाइनपेक्षाही जास्त चर्चा या चष्म्याच्या किंमतीमुळे रंगलीये.
-
कंपनीने या चष्म्याची किंमत तब्बल 55 हजारांच्या घरात ठेवलीये. इतक्या महागड्या किंमतीमुळे आणि विचित्र डिझाइनमुळे नेटकरी गुच्ची कंपनीला जबरदस्त ट्रोल करत आहेत. हाच तो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' अशाप्रकारच्या विविध मजेशीर कमेंट करत नेटकरी कंपनीची आणि चष्म्याची जबरदस्त खिल्ली उडवत आहेत. (सर्व फोटो : ट्विटर )

Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा