काही व्यक्तींच्या कल्पनाशक्ती किंवा विचारक्षमता ही अत्यंत निराळी असते. अनेकदा ते इतरांपेक्षा काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यातूनच मग नव्या वस्तूंचा किंवा रचनांचा शोध लागतो. ( सौजन्य : जनसत्ता) बऱ्याचदा काही जण त्यांची क्रिएटिव्हिटी वापरून इतक्या हटके वस्तू तयार करतात की अनेकदा ते पाहणारा एकतर अचंबित होतो किंवा चक्रावून जातो. त्यामुळेच अशाच काही चक्रावून टाकणाऱ्या कलाकृती किंवा वस्तू कोणत्या त्या पाहुयात. समोर दिसत असलेला हा सोफा असून त्याची रचना अंड्यांच्या ट्रेप्रमाणे आहे. मात्र, पहिल्यांदा पाहिल्यानंतर तो अंड्यांच्याच ट्रेपासून तयार केला आहे की काय असा भास अनेकांना होतो. सध्याच्या काळात बेड, सोफा किंवा पलंग हे विविध डाझाइन किंवा आकारात सहज उपलब्ध होतात. मात्र, हा बेड तयार करताना वापरण्यात आलेली क्रिएटिव्हिटी चक्रावून टाकणारी आहे. यावर माणसाने नेमकं झोपावं कसं हा एकच प्रश्न तो बेड पाहिल्यावर पडतो. रेसॉर्टवर गेल्यानंतर जर तिथे स्वच्छ पाण्याने भरलेला स्विमिंग पूल असेल तर अनेकांचा आनंद गगनात मावत नाही. परंतु, हा स्विमिंग पूल पाहिल्यानंतर त्याच्यात उतरण्याची अनेकांनी भीती वाटेल. या पूलाच्या आत बसवण्यात आलेल्या टाइल्सवर शार्क माशाचं चित्र रेखाटण्यात आलं आहे. हे कपाट पाहिल्यानंतर ते खास मुलींसाठीच तयार केलंय की काय असा प्रश्न निर्माण होतो. हो. समोर दिसत असलेला हा ड्रेस नसून ते चक्क कपाट आहे. दोन व्यक्तींमध्ये प्रेम होतं हे तर साऱ्यांनाच माहित आहे. पण या खुर्च्यांकडे पाहिल्यानंतर त्या खरंच एकमेकांच्या प्रेमात आहेत की काय?असा मजेशीर प्रश्न उभा राहतो. या खुर्चांच्या मागे खास हटके अशी डिझाइन तयार करण्यात आली आहे. तुम्ही आजवर टेबलाचे अनेक आकार पाहिले असतील. परंतु, या अशा पद्धतीचं टेबल पहिल्यांदाच पाहण्यात आलं असेल हे नक्की. गाड्यांची आवड असणाऱ्या या व्यक्तीने त्याच्या ऑफिसचा लूकच पूर्ण गाडीप्रमाणे दिल्याचं दिसून येत आहे. -
( सौजन्य : सर्व फोटो जनसत्ता)

“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक